Home यवतमाळ आजादी का अमृत महोत्सवानिमित्त बळीराम पाटील महाविद्यालयात देशभक्तीपर सामुहिक गीताचे सादरीकरण

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त बळीराम पाटील महाविद्यालयात देशभक्तीपर सामुहिक गीताचे सादरीकरण

9

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त बळीराम पाटील महाविद्यालयात देशभक्तीपर सामुहिक गीताचे सादरीकरण

बळीराम पाटील महाविद्यालय किनवट राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” “हर घर झेंडा” व “स्वराज्य” महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रीय सेवा योजना बळीराम पाटील महाविद्यालयाचे वतीने देशभक्तीवर सामूहिक गीताचे आयोजन करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवराज बेंबरेकर हे उपस्थित होते. सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच.पूजार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सुरुवातीला राष्टीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार यांनी आजादी का अमृत महोत्सव व सामूहिक गीता विषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन देशभक्तीपर सामूहिक गीतांचे सादरीकरण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून करण्यात आले. शेवटी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी मानवंदना दिले याप्रसंगी या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रा. विजय खूपसे,उपप्राचार्य गजानन वानखेडे, प्रा. गोवर्धन लांब, एन. सी. सी. विभाग प्रमुख प्रा. काझी,प्रा. शेषेराव माने, आजादी का अमृत महोत्सव स्थानिक अध्यक्ष डॉ. पंजाब शेरे प्रा. वैभव घुगे, प्रा. ज्ञानेश्वर चाटे डॉ. लता पेंडलवाड,प्रा. मंदाकिनी राठोड, प्रा. अंकुश सिक्कलवार,प्रा. प्रियंका जाधव, प्रा.अभिलाषा वाटिले, प्रा.ऋतुजा कराळे ,प्रा. पूनम बडोदेकर, प्रा. गायकवाड, आदींची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी गणवेश मध्ये देशभक्तीपर गीत सादरीकरण केल्याने महाविद्यालय व परिसरामध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले महाविद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनीची उपस्थित होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील ,डॉ. योगेश सोमवंशी यांनी प्रयत्न केले शेवटी राष्ट्रीय कार्यात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार यांनी आभार मानले.

Copyright ©