शासकीय आश्रमशाळा हिवरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात
तालुक्यातील हिवरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत ९ऑगष्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी हिवरी येथील ग्रामस्थ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शैलेंद्र मिश्रा तर प्रमुख पाहुणे हिवरी येथील सरपंच रंजनाताई भगत,ग्रा.प.सदस्य संध्याताई अतकरी, सुषमा राऊत,अनंत राऊत, संदिपभाऊ खोडकुंभे, विठोबाजी कोडापे,पोलिस पाटील दिगंबर शहारे, आदिवासी कार्यकर्ते नामदेवराव मडावी, तलाठी डवले साहेब आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी तसेच मान्यवरांनी भाषणातून आदिवासी दिनाचे महत्व, आदिवासी परंपरा, संस्कृती ,आणि आदिवासी क्रांतिकारक या विषयावर विचार मांडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी बॅण्ड च्या तालावर लेझीम पथकाद्वारे पाहूण्यांचे स्वागत केले. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थीनींनी आगळ्या वेगळी पारंपरिक नृत्ये सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेत आयोजित केलेल्या चित्रकला,रांगोळी,संगित खुर्ची,निबंध,नृत्य स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व विजयीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे बहारदार संचालन अनिता खाटकर यांनी तर आभार प्रदर्शन संतोष शेनमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य शैलेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वात भास्कर हंबर्डे, संतोष शेनमारे,सरीता राजुरकर,दिपाली देशमुख सारिका हांडे, अनिता खाटकर,मेघना शिरभाते,रंजना भोयर, नरेंद्र बोरकर, मनीष कपिले, भगवान तुमसरे, सुनिता काकपूरे,आशा सावरकर, संगिता कुळसंगे, संजय भुजाडे,विनोद क्षिरसागर,सविता राठोड,निखिल मडावी, गजानन कोकाटे, कैलास पवार,विजय वडते,बर्षा वरटकर, गणेश कनाके,बबन मारबते,मिरा अजमिरे,दुर्गा बुराण,कवडू तायकुटे,बंडू मेश्राम यांनी अथक प्रयत्न केले.
