नागपूर विद्यापीठातून वगळलेल्या महानुभाव साहित्याचा त्वरित समावेश करा.यवतमाळ जिल्हा महानुभाव मंडळ
नागपूर विद्यापीठात महानुभाव साहित्याचा ग्रंथ बीए च्या अभ्यासक्रमात स्वातंत्र रूपाने राहिला आहे ,परंतु तो आता अभ्यासक्रमातून वगळण्यात आला असून यापुढे बीए मराठी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानुभाव साहित्य अभ्यासता येणार नाही .यामुळे महानुभाव पंथीयांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. नागपूर विद्यापीठाला महानुभाव साहित्य अभ्यासकांचा फार मोठा वारसा लाभला आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार दोन वर्षा आधी विद्यापीठात भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र स्थापन करण्यात आले, महानुभाव साहित्याची विशेषता दखल घेण्यात यावी यावर सखोल संशोधन संपादन व्हावे व त्यातील सामाजिक सांस्कृतिक मूल्यांचा प्रचार प्रसार व्हावा हा अध्यासन निर्मितीमागील प्रमुख उद्देश आहे. मराठी भाषेच्या शास्त्रोक्त शिक्षणासाठी महानुभाव ग्रंथाची अत्यंत आवश्यकता आहे यापूर्वी सातत्याने महानुभाव साहित्यातील लीळाचरित्र, रिद्धपूर चरित्र ,दृष्टांत पाठ, स्मृतीस्थळ ,महदंबेचे धवळे, महाकवी नरेंद्र चे रुक्मिणी स्वयंवर आदींचे महानुभाव साहित्याचे विविध अभ्यासक्रिय ग्रंथ बीए मराठी साहित्यात अलटून पालटून देश-विदेशातील विविध विद्यापीठासह नागपूर विद्यापीठातील अभ्यासक्रमात शतक भरापासून समावेश केला जात आहे .परंतु या परंपरेला प्रथम नागपूर विद्यापीठाने हेतू पुरर्सरपणे नाकारले आहे . यामुळे महानुभाव साहित्याचा आजवर ज्या प्राधान्याने अभ्यासक्रमात समावेश केला जात होता त्याच प्राधान्याने पुन्हा तो समावेश करून घ्यावा, या आशयाचे निवेदन मा.मुख्य मंत्री यांना जिल्हा अधिकारी यवतमाळ यांचे तर्फे देण्यात आले.जर तसे न झाल्यास महानुभाव पंथीय रस्त्यावर उतरून संपूर्ण भारतभर तीव्र आंदोलन छेडू
