Home यवतमाळ महिलांनी स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने लघु उद्योगांकडे वळावे- ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर

महिलांनी स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने लघु उद्योगांकडे वळावे- ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर

8

महिलांनी स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने लघु उद्योगांकडे वळावे – ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर

तिरंगा आपली आन-बान-शान

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत तेंडोळी येथे महिला सभा

महिला स्वयंपूर्ण झाल्या तर गांव आणि गांव स्वयंपूर्ण झाले तर सारा देश स्वयंपूर्ण होईल. आणि म्हणूनच महिलांनी मासिक बचतीसोबतच आपल्या समूहाच्या माध्यमातून लघु उधोगाकडे वळावे असे आवाहन करीत तिरंगा आपली आन-बान-शान आहे. प्रतिवर्षी तो फडकविण्याचे सौभाग्य आपणास मिळत नाही मात्र यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपणास तिरंग्याशी समरस होण्याची संधी आपणास मिळत आहे तेव्हा प्रत्येकाने आपल्या घरावरती तिरंगा डोलाने फडकवावा असेही आवाहन ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी केले. ते तेंडोळी येथील आझादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित महिला सभेत बोलत होते.

ग्रामपंचायत तेंडोळी येथे महिला सभा व तिरंगा ध्वजाचे वितरण कार्यक्रम सरपंचा सौ.सपना.आर.राठोड व ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे नियोजन सी आर पी ज्योतीताई निंबाळकर याच्या सह सर्व सी आर पी व कॅडर नी केले.

यावेळी हर घर तिरंगा या विषयावर बोलतांना ध्वज संहिता समजावून देण्यात आली. तसेच गुणवन्त विध्यार्थी सन्मान, घरकुल बांधकाम, हार घर जल अभियान, कोविड 19 मधील मृताच्या वारसास लाभ न मिळणे, आणि मासिक बचत, आणि महिला सक्षमीकरण या विषयावर ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी आढावा घेत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ ज्योतीताई निंबाळकर यांनी केले. यावेळी सी.आर.पी. वर्षा निंबाळकर, कल्पना नागोसे, एस.एल.सी. आर.पी. प्रिया सहारे, पशुसखी शारदा निकुरे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा सविता शिंदे, सचिव लता नागोसे, रेखा राठोड, दुर्गा कोलते, तारा राठोड, लेखापाल रंजना नागोसे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या.

आपल्या वैभवशाली इतिहासाचा गौरव सर्वांनी तिरंगा फडकवून करावा

भारतीय स्वातंत्र्य महोत्सवाची 75 वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हरघर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत आर्णी तालुक्यात तीस हजारांहून अधिक घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहेत. यासाठीची जय्यत तयारी पंचायत समिती प्रशासनाकडून करण्यात येत असून पंचायत समिती स्तरावर तथा ग्रामपंचायत स्तरावर देखिल ध्वज विक्री केंद्राच्या माध्यमातून ध्वज उपलब्ध करून दिल्या जात आहे. तेव्हा सर्वांनी आपल्या घरावर ध्वज फडकवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदात साजरा करावा.

श्रीमती जयश्री वाघमारे,
गट विकास अधिकारी,
पंचायत समिती, आर्णी

Copyright ©