Home यवतमाळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला व देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला व देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन

9

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला व देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन

यवतमाळ- श्री गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा प्रचार समिती , मानवता मंदिर , शिवनेरी सोसायटी यवतमाळ व कै. बाळासाहेब पांडे नागरी पतसंस्था, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत “व्याख्यानमाला व शालेय विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय समूहगीत” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
” स्वातंत्र्याच्या यज्ञ कुंडातील समर्पित समिधा : एक इतिहास “या विषयावर दि. ११ऑगस्टला तोष्णा मोखडे, १२ ऑगस्टला डॉ. ललितकुमार व-हाडे, निवासी जिल्हाधिकारी, यवतमाळ, १३ऑगस्टला, प्रा. प्रवीण देशमुख व १४ ऑगस्टला प्राचार्य डॉ अनुप कोठारी , यवतमाळ .या सर्व व्याख्यात्यांची व्याख्यानाची वेळ नियोजित तारखेप्रमाणे सायंकाळी ६:४५ वा. राहील तसेच
दि. १५ ऑगस्टला शालेय विद्यार्थ्यांकरिता ” देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे” आयोजन दुपारी १:०० वाजता करण्यात आले आहे. प्रथम बक्षीस २५०१ व सन्मानचिन्ह, द्वितीय बक्षीस २००१ व सन्मानचिन्ह, तृतीय बक्षीस १५०१ व सन्मानचिन्ह, चतुर्थ बक्षीस १००१ व सन्मानचिन्ह तसेच सर्व सहभागी शाळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. स्थळ – मानवता मंदिर, शिवनेरी सोसायटी, आर्णी नाका, वडगाव रोड, यवतमाळ .
वरील सर्व कार्यक्रमांना श्रोत्यांनी व स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन विनायक बोदडे , अध्यक्ष यांनी केले आहे.

Copyright ©