घाटंजी :प्रतिनिधि अमोल नडपेलवार
घाटंजी येथे शांतता समितीची सभा
घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची सभा जलाराम सभागृहात जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक खांदेराव धरणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात प्रमुख पाहुणे न्यायाधीश ए.ए. उतपात व ए.कळमकर
नगर परिषद मुख्याधिकारी अमोल माळकर, वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव नायब तहसीलदार दिलीप राठोड रुपेश सावरकर पारवा पो स्टे ठाणेदार विनोद चव्हाण वडगाव जंगल पो स्टे चे ठाणेदार पवन राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटंजी पो
स्टे. चे ठाणेदार मनिष दिवटे यांनी केले घाटंजी तालुक्याची पार्श्वभूमी व शांतपूर्ण शहराचे व तालुक्याचे माहिती सांगितले व सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस अधिक्षक धरणे साहेब यांनी पुढील तीन महिने होणारे सण उत्सव रक्षाबंधन शेतकऱ्यांचा सण पोळा गणेशत्सव व त्यात सतत पडणाऱ्या पाऊस यात सर्व सण शांतपणे साजरा करावे त्यात मागील दोन वर्षे कोरोना मुळे सण उत्सव साजरा करण्यासाठी कडक निर्बंध होते त्यामुळे आनंदमय वातावरण व कोरोना च्या नियमांचे पालन करावे गणेशमंडळाने धर्मदाय मध्ये नोंदणी करावे त्यामुळे वर्गणी दार यांच्यात वाद होणार नाही गणेशमंडळनी साउंड स्टीटीम परवानगी घ्यावी
डिजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवावी त्यामुळे महिलांचा सहभाग वाढेल व संस्कृति ची जोपासना होईल समाज उपयोगी कार्यक्रम घ्यावे सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे साजरा करावेत,अन्य सूचना यावेळी देण्यात आल्या.
घाटंजी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए.उतपात साहेब समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे आहे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्य समाजातील वंचित घटकाला मोफत सल्ल्या व मार्गदर्शन केले जातात विधी सेवा समिती चे कार्य पोलीस व न्याय व्यवस्थित ताण कमी करणे हा उद्देश आहे न्यायालयीन खटले कमी करण्याच्या उद्देशाने समाजामध्ये न्याय व व्यवस्था शांतपूर्ण ठेवावे व लोक अदालत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले
कार्यक्रमाचे संचालन राजेश उदार यांनी तर उत्कृष्ट रित्या आभार प्रदर्शन पारवा येथील ठाणेदार विनोद चव्हाण यांनी केले. सदर शांतता कमिटी ला घाटंजी तालुक्यातील पत्रकार सामाजिक व विविध पक्षाचे कार्यकर्ते घाटंजी पारवा वडगाव पोलिस स्टेशन मधील पोलीस पाटील तंटा मुक्त समिती अध्यक्ष यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घाटंजी येथील उपनिरीक्षक विलास सिडाम
गोपनीय विभागाचे वामन जाधव, कलीम कय्युम घाटंजी पोलीस विभागातील सर्व कर्मचारी यांनी अतिशय चांगले नियोजनात सभा पार पडली
बॉक्स
खांदेराव धरणे सहाय्यक पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी शांततापूर्ण व पारंपरिक वाद्य सांस्कृतिचे वारसा जोपासत महिलांच्या उपस्थित सण उत्सव साजरे करावे असे आवाहन केले
