Home यवतमाळ शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळच्या खेळाडूची जिल्हा स्तरीय पींच्याक सिलॅट स्पर्धेत बाजी

शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळच्या खेळाडूची जिल्हा स्तरीय पींच्याक सिलॅट स्पर्धेत बाजी

28

शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळच्या खेळाडूची जिल्हा स्तरीय पींच्याक सिलॅट स्पर्धेत बाजी

पिंच्याक सिलॅट असोसिएशन, यवतमाळ तर्फे तिसरी जिल्हास्तरीय पिंचाक सिलॅट स्पर्धचे आयोजन तसेच एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नेहरू स्टेडियम, गोधणी रोड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळचे खेळाडू कु. आलीया चव्हाण, कु. आदिश्री तेलंग, कु. गौरी खोडकुंभे, श्रवण कडूकर, आदर्श जाधव, पियुष राठोड व यश दरवेकर यांनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखवुन प्रथम क्रमांक प्राप्त केले. तसेच चंदन राऊत यानी द्वितीय क्रमांक प्राप्त केला , प्रथमेश काकडे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला या खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक रोहित केवारकर, विनोद खोडकुंबे, अजित मिश्रा, हेमंत उइके व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थियांचा कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ), ओंकार चेके (अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीण पत्रकार संघ), मनोज झाडे (सचिव पिंच्याक सिलॅट असोसिएशन, यवतमाळ) प्रवीण दिघाड़े, रविन्द्र महानुर, व मनोज गुजरे यांनी केले.

Copyright ©