Home यवतमाळ गरमसुर येथे विहीर, हॅन्डपंपची पाणी पातळी खोल, पाण्याचा प्रश्न ऐरणीवर 

गरमसुर येथे विहीर, हॅन्डपंपची पाणी पातळी खोल, पाण्याचा प्रश्न ऐरणीवर 

9

आकोली पप्रतिनिधी सचिन चावरे

गरमसुर येथे विहीर, हॅन्डपंपची पाणी पातळी खोल, पाण्याचा प्रश्न ऐरणीवर 

वर्धा जिल्ह्याच्या व सेलू तालुक्याच्या शेवटच्या टोकावर, जंगल व्याप्त परिसरात वसलेले गरमसुर गाव चहू बाजूंनी जंगलाने वेढलेले असून या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे दिसून येत आहे.
दुष्काळाची दहाकता वाढल्याने तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला आहे. हातपंप कोरडे पडले असल्याने पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
या गावांमध्ये नळयोजना आहे.मात्र, सलाम यांच्या शेतातील विहिरीवरून गावासाठी पाणीपुरवठा करण्यात येत असतो परंतु त्या विहिरी ची पातळी खोल गेली असल्यामुळे नियमित पाणी पुरवठा करू शकत नाही. नळ योजना चार दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येतो. कधी मिळते कधी मिळतही नाही. अवस्था गंभीर असून गावाबाहेर ग्रामपंचायतीच्या विहीरीवर पाण्यासाठी दिवस भर गर्दी असल्याचे चित्र दिसून येते.
गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याची वेळ आली असून, परिसरातील ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. मात्र, परिसरातील बऱ्याच गावात सध्या पाण्याच्या समस्येने होरपळत आहे. तालुक्यातील नागरिकांना पाणी दुष्काळामुळे अधिग्रहण केलेल्या विहिरी देखील आता आटत चालल्या आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर नागरिकांची तहान भागविण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. येथील गावातील ग्रामस्थांनी आपल्या समस्येचा पाढा वाचला असुन पाण्याच्या समसेचा मोठा सामना करावा लागत आहे.परिणामी येथील समस्या निकाली काढण्यासाठी ग्रामपंचायतिनी तसेच प्रशासनानी हातभार करण्याची गरज आहे

Copyright ©