उपविभागीय अधिकाऱ्यांचे आश्वासन ग्रामस्थांचे हाल करणार का?
भांब राजा येथील राष्ट्रीय महा मार्ग झाल्या पासून येथील ग्रामस्थ अनेक संकटाचा सामना करीत आहे गावाबाजुचा नाला बुजविण्यात आला व ज्या नाल्या काढण्यात आली त्या नाल्या रस्त्याच्या उंच घेन्यात आल्या त्या मुळे रस्त्याचे पाणी गावात शिरते त्या मुळे अनेक ग्रामस्थांचे नुकसान होते यात अनेकांना घर सोडून दुसरीकडे आसरा घ्यावा लागतो या बाबत मागील तीन वर्षापासून येथील ग्रांपचयत तथा ग्रामस्थानी अनेक निवेदने दिले चक्का जाम आंदोलन केले,मोर्चा काढला तरी पदरात निराशाच मिळाली, यातच पंधरा दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी यांना भांबराजा येथील सिस्ट मंडळांनी निवेदन दिले या वेळी उपविभागीय अधिकारी यांनी सातदिवसात काम करण्याचे आश्वासन दिले परंतु अजूनही कोणत्याच प्रकारची यंत्रणा कामी लागली नसून पुन्हा येथील ग्रामस्थांना संकटाचा सामना करावा लागेल का?असा सवाल ग्रामस्थानी केला आहे.
