चालू सन्मान आणि समान विचाराच्या वाटेवर..
21 व्या शतकाच्या पूर्वीच्या कालखंडाचा जरा आढावा घ्यावा म्हणतो. तो घेतल्याशिवाय समोर येणाऱ्या शब्दांना महत्वचं काय? अस म्हणायला वावग ठरणार नाही. ज्या दोन गोष्टींना आधारस्तंभ मानून आपण पुढे जाणार आहोत त्या म्हणजे सन्मान आणि
समान या दोन शब्दामुळे प्रत्येक माझ्या मातेच्या व प्रत्येक माझ्या बहिणीच्या आणि माझ्या, अशा प्रत्येक स्वतंत्र महिलेच्या आयुष्यासाठी तिच्या सन्मानासाठी, समानतेच्या अधिकारासाठी घडवलेली क्रांती आपल्याला विसरता कामा नये ती क्रांती म्हणजेच मुलींना चूल आणि मूल व घरातलं शोभेच फुल अशा रिंगणातून बाहेर काढून तिच्या क्षेत्राला व्यापक दृष्टी देणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या थोरवी गायली व गात राहली तरी तरी कमी आहे. परंतु ही थोरवी गाताना त्यांना स्मरताना आज कुठेतरी मन स्वतःलाच खातंय, या असो किंवा अनेक महापुरुष स्वतंत्र भारतात होउन गेलेत ज्यांची त्यांची शैली,शिकवण,मार्ग हे वेगवेगळे होते परंतु त्यांनी केलेले कार्य हे स्वतंत्र भारतासाठी, स्वतंत्र भारतातील व्यक्तींसाठी च होते, त्यांचे कर्यमागचे तप व संघर्ष तितकेच कठोर होते, ज्याची आपण स्वपणातही कल्पना करू शकणार नाही. मग सत्यात उत रवण तर दूरच, मग वर्तमानात याची जाण ठेउन आपण करतो तरी काय? आणि जे करतोय ते खरंच अशा सर्व महापुरुषांच्या चरणी अर्पण करण्या योग्य आहे का? आज सावित्रीमाईनी आम्हा मुलींना/ महिलांना 1848 च्या काळी घरी दारी समाजात समान व सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून रक्ताच पाणी करून कार्य केले, त्याचेच फलित म्हणून आपण १ जानेवारी हा दिवस आजही आपण ‘ फुले दाम्पत्य सन्मान दिवस’ म्हणून साजरा करतो. आज मान्य आहे माझी माता माझी भगिनी विविध क्षेत्रात आपली कीर्ती साधत आहे, यश मिळवत आहे, तीला घरच्यांचा पूर्ण पाठिंबाही आहे, सासरचे ही शिक्षण शिकायला अडथळा आणत नाही बर का, ऑफिस मध्ये ही खूप चांगली वागणूक मिळते, येत्या- जात्याच्या नजरा आणि माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा योग्यच आहे, आज मी एक उत्तम गृहिणी आहे, डॉक्टर आहे, आज मी प्राध्यापक आहे, आज मी कार्पोरेट वर्ल्ड मध्ये आघाडीवर काम करणारी महिला आहे, आज मी अंतराळवीर आहे, आज मी साएन्स टि स्ट आहे. सगळं सगळ आहे पण या सर्वांचं प्रमाण काय आहे, आजच्या या काळात अशी अनुकूल सन्मान आणि समानतेची वागणून प्रत्येकालाच मिळते काय? आणि प्रत्येक वेळी मिळते काय? हा प्रश्न समाजाच्या आत जरा विचारांच्या खोलीत डोकावताना पडतो, कारण बाह्यरूप जरी मोहक असल तरी ते काळानुसार बदलणारच आहे, बदलत नाही ते अंतर मन जे आणि त्यापर्यंत पोहचण्यासाठी लागते ते व्यापक दृष्टी, व्यापक विचार. आजही काही संकुचित विचार प्रवृत्तीला बळी पडून महिला,मुली आपले क्षेत्र स्वतःच संकुचित करून घेत आहे तिने भरारी घ्यायची वेळ असताना तिचे पंख जड होउन उडण नकोस वाटत आहे, वातावरणातील बंधिस्त पणामुळे ती अजून बांधिस्त होत आहे. कुठेतरी विविध क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठून ही संकुचित विचारांचे मळभ तिला गाठलेलेच दिसत आहे, समाजापुढे उभे करून स्त्री सन्मानाचे धडे गिरवले जातात. तर एका बाजूस तिला काळोखात ढकलतात, तिच्या बुध्द कौशल्याचा, तिच्या भावनेचा, तिच्या विचारां चा, तिच्या शिक्षणाचा, तिच्या नोकरी पेशाचा, वा व्यवसायाचा आदर हा व्हायलाच पाहिजे,लिंग भेदभावाचा प्रभाव कुठेही पडता कामा नये, तिला समान आणि सन्मानाची वागणूक ही जीवनाच्या पडद्यावर व पडद्यामागे ही तेवढ्या ला तेवढीच मिळायला पाहिजे. कारण कोणतीही स्त्री ही एक आई,आजी, बहीण, बायको, किंवा इतर नात्यात गुंतण्या आधी अगोदर सृजनशील मन असलेली एक जिवंत व्यक्ती आहे, तिला स्वतंत्र तीचहीअस्तित्व आहे.ती आपल्या नात्यातील आनंदासाठी सुखासाठी तीच अस्तित्व विसरते पण ती विसरली म्हणून आपण तिचे अस्तित्व प्राप्त करून देण्या ऐवजी तिचे अस्तित्व संपुष्टात आणयाला निघालो. आज संपूर्ण सृष्टीत एका जरी महिले चा अपमान होत आहे, तिच्यावर हिंसाचार, अत्याचार होत आहे, तिला अस मा नतेची किंवा अपमानास्पद वागणूक मिळत आहे तर काय राहाल माझ्या सावित्रीमाई ने आणि जोतिबांनी केलेल्या संघर्षाचं मोल ते तर सार धुळीत मिळालं. हा कुठला विषय नसून समाजाची मानसिकता व समाजाची वास्तविकता आहे असं सगळं पाहताना स्वतःचे मन स्वतःला खाते. आज 21 व्या शतकातही समाजधारणा बदलायला हवी, केलेल्या अपमानास्पद वागणुकीवर, झालेल्या अत्याचारावर, झालेल्या हिंसाचारा वर , जशी न्याय प्रणाली द्वारे तरतुदी केल्या जातात, त्याच सोबतीला समाज मानवाच्या विचारांची व्यापकता वाढवणे, व स्त्री यांप्रती वातावरणात अधिक खुलेपणा आणण्याची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक कृती ही मन आणि मेंदू ला आवाक्यात घेऊन विचारात शिरते आणि तिथूनच सुरुवात आणि तिथूनच अंत होतो. म्हणून बदल कायम स्वरुपी विचारातूनच व्हायला पाहिजे. आज काही महिला विशेष दिवस आहेका, आज काही मोहिले संदर्भात घटना घडलीका ? अस म्हणून लेख वाचताना किंवा अप्रत्यक्ष माझ्या विचारांशी हितगुज करताना कॅलेंडर कडे, किंवा वर्तमानाचे पानांनकडे बघू नका कारण २००१ : कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील ‘वूमन ग्रॅंडमास्टर’ बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे. असा दीन सोडला तर महिला विषयक आज नेमक काही नाही परंतु आज हा लेख का? तर हा विचार येणे म्हणजेच आपल्या विचारांना व्यापक करण्याची वेळ मानावी.
Ku पायल किनाके
(कृष्णमाला)
