Home यवतमाळ दिग्रस बायपास आर्णी रस्त्याचे काम रद्द झाल्याची अफवा

दिग्रस बायपास आर्णी रस्त्याचे काम रद्द झाल्याची अफवा

24

दिग्रस बायपास आर्णी रस्त्याचे काम रद्द झाल्याची अफवा

दिग्रस ते आर्णीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम जवळपास ५ ते ६ वर्षांपासून सुरू केले होते. तेव्हा रस्त्याच्या कामासाठी खरेदी असलेल्या घरांना उठविण्यात आले. काही दिवस काम सुरू राहिले उठविलेल्या घराच्या जवळील रस्त्याचे ३०० मीटर रस्त्याचे काम ५ ते ६ वर्षांपासून रखडले होते. उठविलेल्या घरांना मोबदला मिळायचा आहे. अशातच दिग्रस शहरात हा रस्ता रद्द झाल्याची अफवा पसरल्याने तेथील नागरिकांनी पुन्हा घराचे बांधकाम सुरू केले.
दिग्रस आर्णी बायपास रस्त्याचे काम रखडल्याने या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून राहत होते. या रस्त्यावर अनेक अपघात घडले. तरीही प्रशासनाने रस्त्याच्या कामासाठी उठविलेल्या घरांना मोबदला दिला नसल्याने या रस्त्याचे काम रखडले होते. अशातच हा रस्ता ५ ते ६ वर्ष लोटून पूर्ण होत नसल्याने हा रस्ता रद्द झाल्याची एकच अफवा पसरली त्यामुळे उठविलेल्या घरांनी पुन्हा त्याठिकाणी घरे बांधण्यास सुरुवात केली. या बाबत नॅशनल हायवे अमरावती कथलकर यांना आमच्या प्रतिनिधी ने संपर्क साधला असता रस्त्याचे काम रद्द झाले नसून उठविलेल्या घरांच्या काही नागरिकांना मोबदला देण्यासाठी तरतूद सुरू असून लवकरच ३०० मीटरचा रस्ता पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.

Copyright ©