एमएसपी कायदा होत नाही तोपर्यंत शेतकरऱ्यांनी संघर्ष सुरूच ठेवावा राजन शिरसागर , किसान नेते
यवतमाळ:- महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा यवतमाळ चे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन १० में रोजी श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे उत्साहात संपन्न झाले अध्यक्षस्थानी कॉ. वासुदेव गोहने ,झरी तर प्रमुख पाहुणे कॉ.अशोक सोनारकर , राज्य सचिव , किसान सभा, अमरावती तर कॉ राजन शिरसागर , किसान नेते , परभणी, हे उपस्थित होते , मार्गदर्शन करताना कॉ.राजन शिरसागर यांनी किसान सभेचे इतीहासाहावर प्रकाश टाकून महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसुड हे पुस्तक लिहिले शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला तसेच शाहु महाराज , क्रांतिसिंह नाना पाटील यांचेही शेतकरी वर्गा करता असलेले योगदान विसरता येणार नाही तसेच खा.नाना पाटील हे पहिले किसान सभेचे नेते आहेत ज्यांनी शेतकऱ्यांना कर्ज फीटले म्हणा व कर्ज माफी बदल संसदेत आवाज उठविला क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रज सरकार च्या काळात आंदोलन केले पुढे म्हणाले तीन काळे कृषी कायदे हानुन पाडण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी बलीदान दिले त्या शेतकऱ्यांचे स्मरण करून संयुक्त किसान मोर्चा उभा करून सर्व संघटना लढल्या त्या बाबत माहिती देवून आज व्यापारी वर्ग शेतकरी वर्गाचे शोषण करीत असुन उत्पादन खर्चावर आधारित भाव मीळने आवश्यक आहे त्या करीता एमएसपी कायदा होने गरजेचे आहे तरच शेतकरी टीकू शकतो , शेतकरी वर्गाने आत्महत्याचा मार्ग न अवलंबता सरकारला एमएसपी कायदा करने भाग पाडावे त्या करीता भविष्यात संघर्ष करावा असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी कॉ.अशोक सोनारकर यांनीही मार्गदर्शन केले, कॉ. वासुदेवराव गोवने यांनी अध्यक्षीय भाषणाने समारोप केला प्रास्ताविक कॉ.गुलाबराव उमरतकर जिल्हा सचिव किसान सभा यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉ.निरंजन गोंधळेकर,सहसचीव यांनी केले यावेळी कॉ.दिवाकर नागपुरे यांनी ठराव माडला शेतकऱ्यांना शेती कर्ज एकरी एक लाख रुपये द्यावे , कृषी कर्ज वाटपाचे बॅंकांनी पतधोरण हे शेतकऱ्यांची थट्टा करणारे आहे १० ते १५ लाख रुपये एकराची जमीन गहाण करून फक्त १० ते २० हजार रूपये एकरी देण्याचे पत धोरण बॅंकांनी ठरविले ते बदलले पाहिजे असा ठराव मांडला त्या ठरावाला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात पाठिंबा देवून ठराव एकमताने मंजूर केला यावेळी एकूण पाच ठराव घेण्यात आले तसेच किसान सभेची जिल्ह्यात वार्षिक १० हजार सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. अधीवेशेन यशस्वी करण्यासाठी पांडुरंग ठावरे , संजय भालेराव, ईश्वर दरवरे , अॅड. अरूण जवके , जमीरभाई बेग मिर्झा , दिपक माहुरे , बंडु गोल्हर , लता रामटेके , सुमेधा दखने, ज्योती रत्नपारखी, विठ्ठल मडावी , यांनी घेतले यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कॉ.गुलाब उमरतकर जिल्हा सचिव यांनी कळविली आहे
