Home यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल चा सन्मान जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल चा सन्मान जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

22

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल चा सन्मान जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

यवतमाळ :- जिल्ह्यातील रक्तदानाच महत्वाचं कार्य करणारी एकनिल रक्तपेढी यवतमाळ ही यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या औचित्यावर 9 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने वर्धापन दिनाच्या दिवशी रक्तदात्यांचा, शिबीर आयोजकांचा सन्मान करण्यात आला.
झरी तालुक्यातील मुकुटबन येथील प्रफुल भोयर हा युवक रक्तदान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर अमूल्य योगदान देत आहे. त्यांनी केलेल्या बहुमोल कार्याची दखल घेत माननीय जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे साहेब यांच्या हस्ते प्रफुलचा सन्मान करण्यात आला. प्रफुल यांनी जिल्ह्यासोबत महाराष्ट्रातील रक्तदानाची चळवळ बळकटीकरनाचे मोलाचे कार्य केले आहे.
यावेळी रक्तपेढीचे संचालक श्री. सागर तोडकर, केमिस्ट अँड ड्रॅगीस्ट असोसिएशनचे श्री. पंकज नानवाणी, मिलिंद भितकर उपस्थित होते.
जिल्हयातील जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झालेला हा सन्मान जिल्ह्याचा महत्वाचा समजून प्रफुलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Copyright ©