Home यवतमाळ वर्गमित्रांनी बांधले झाडांना पक्षीपात्र

वर्गमित्रांनी बांधले झाडांना पक्षीपात्र

23

वर्गमित्रांनी बांधले झाडांना पक्षीपात्र

मुन्सीपल हाय स्कूल 1995/96 चे वर्ग मित्र उन्हाळ्याचे भीषण गर्मीचे दिवस,पाण्याच्या थेंबा, थेंबासाठी पशु पक्षांची होणारी हेळसांड,,त्यातच बालवयातील मैत्री,बरेच वर्षांनी एकत्र आलेले,पण बाल मनाचे एका परिपक्व समाजशील माणसात रूपांतर झालेले प्रत्येक व्यक्तिमत्त्व, आठ दिवसांपूर्वी हे सर्व मित्र एकत्र आल्यानंतर व प्रत्येकाला सामाजिक समस्यांची जाण असल्यामुळे एक निर्णय घेण्यात आला,तो म्हणजे पक्ष्यांसाठी शहरातील अश्या ठिकाणी पक्षीपात्र झाडांवर लावायचे की जेथे रोजच्या रोज पाणी बदलवता येईल,ठरल्याप्रमाणे 50 पक्षीपात्र तयार करण्यात आले,त्याकरिता सतीश ठाकरे ह्या मित्राने मदत केली,त्यावर सुंदर लिखाण किरण शेंडे ह्यांनी केले,आज सकाळी 7 ते 9 ह्या वेळेत सर्व वर्गमित्र मोहिमेला निघाले,महादेव मंदिर,यवतमाळ,डूमनापूर मंदिर लोहारा व कमलेश्वर मंदिर लोहारा ह्या ठिकाणी झाडांना हे पक्षीपात्र बांधण्यात आले,प्रत्येक ठिकाणी वारंवार पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून स्थानिकांना ही जबाबदारी देण्यात आली,बालपणीच्या मैत्रीला उजाळा मिळाला ह्या अनोख्या उपक्रमाने,तरुण होऊन आपण प्रत्येकजण आपला संसार सांभाळतो आहे व योगायोगाने ह्या धकाधकीच्या जीवनात परत सगळे।भेटलो व ह्या भेटीला पक्षीमित्रांना मुक्त संचार करण्यास आपल्या ह्या उपक्रमाने चालना मिळते आहे हे मोटजे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर होते,ह्यावेळी, गजेंद्र उन्हाळे,प्रमोद खोडे,निलेश नानवटकर,विशाल पाटील,बाळ बोरखडे,मोहन कोडापे,हेमंत सेता, प्रशांत डगवार उपस्थित होते

Copyright ©