Home यवतमाळ मुख्याध्यापिकेच्या चौकशी प्रकरणी कारवाईची मागणी शिक्षण विभागाच्या कारवाईकडे पालकांच्या नजरा

मुख्याध्यापिकेच्या चौकशी प्रकरणी कारवाईची मागणी शिक्षण विभागाच्या कारवाईकडे पालकांच्या नजरा

31

प्रतिनिधी दारव्हा विकी गजलवार

मुख्याध्यापिकेच्या चौकशी प्रकरणी कारवाईची मागणी शिक्षण विभागाच्या कारवाईकडे पालकांच्या नजरा

दारव्हा – पंचायत समिती दारव्हा अंतर्गत येणाऱ्या चाणी केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिकणी येथील मुख्याध्यापिका श्रीमती चवरडोल यांच्या आर्थिक घोटाळ्याची व गैरवर्तनाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दारव्हा यांचेकडे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली होती.या तक्रारीत शाळेला एसएसए अंतर्गत काँम्युटर लँबसाठी २० हजार रु.आलेले आहे.या पैश्यातून १६ हजार ७१० रुपयाचे फर्निचर साहित्य खरेदी केलेले आहेत.पण मुळातच हे साहित्य १५ हजार रुपयाचे झालेले असून पावती मात्र १६ हजार ७१० रुपयाची लावण्यात आलेली आहे.यात १ हजार ७१० रु.आर्थिक घोटाळा केलेला आहे.याचप्रमाणे इतरही आर्थिक बाबींत घोटाळे केले असण्याचा दाट संशय घेतला असून अनेक व्यवहार चेकने न करता रोखीने केले.शाळेच्या कामाच्या नावाने सहीच्या रजिस्टर मध्ये बँक,आँफिस,जिल्हा परिषद ,मिटींग या नावाची नोंद आहे.त्या कधीच शाळेत येऊन शालेय कामकाजासाठी न जाता परस्पर जाऊन शाळेत नेहमीच गैरहजर राहतात. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांनी उपभोगलेल्या रजेवर खाडाखोड करुन स्वाक्ष-या केलेल्या आहेत.तसेच वर्षाला फक्त १२ किरकोळ रजा मिळतात. परंतू चवरडोल यांनी १४ किरकोळ रजा घेतलेल्या आहे.त्या कधीही वेळेवर शाळेत येत नाही. त्यांनी वर्ग ६ ते ८ चा हिंदी विषय घेऊनही आजपर्यंत वर्षभरात आमच्या मुलांना काहीही शिकविलेले नाही. यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. असे आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रारीत नमूद केले आहे . या तक्रारीच्या अनुषंगाने दारव्हा पंचायत समिती शिक्षण विभागाकडून गुरुवार दि.२१ एप्रिलला शिक्षणविस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी शाळेला भेट देऊन मुख्याध्यापिकेला पालकांच्या तक्रारीचा कागद देऊन खुलासा देण्यास सांगितले.चार दिवसाची संधी दिल्यानंतर पुन्हा २५ एप्रिलला शाळेला भेट देऊन चौकशी करण्यात आली.यावेळी गावातील पालकांनी केलेल्या सर्व आरोपांचे गंभीर असलेले सर्वच पुरावे सादर करुन चौकशी अधिका-यांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे एकाच साहित्य खरेदीच्या, एकाच तारखेच्या व एकच पावती क्रमांक असलेल्या वेगवेगळ्या २ पावत्या व मूळ खरेदी असलेली १५ हजार रुपयाची १ पावती अशा एकूण तीन पावत्या चौकशी दरम्यान सादर झाल्यात. यापैकी कोणती पावती खरी ? असा प्रश्न निर्माण झाला असून मूळ पावती शोधण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे उभे ठाकले आहे.तसेच इतरही आरोपांच्या संबंधात मुख्याध्यापिकेची चौकशी झाली. आता मात्र पंचायत समितीने केलेल्या चौकशीच्या अहवालाकडे पालकांच्या नजरा लागलेल्या असून प्रशासन काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

एकाच वस्तूच्या ,एकाच दिवशीच्या तीन पावत्या
चौकशी अधिकारी मुख्याध्यापिकेचे वर्गमित्र असल्यामुळे त्यांनी कोणतेही दप्तर न तपासताच चौकशीच्या चार दिवसापूर्वी तक्रारीचा कागद मुख्याध्यापिकेकडे दिल्यामुळे त्यांना संधी मिळून मूळ पावती क्र.२० बदलवून मूळ पुरावाच नष्ट करण्यात आला आहे.त्यामुळे एकाच वस्तूच्या,एकाच तारखेच्या तीन पावत्या झाल्याची गावात खमंग चर्चा आहे.

कठोर कारवाई करा
जसा मुख्याध्यापक तशी शाळा असते. मुख्याध्यापकाचे प्रथम कर्तव्य शाळेत नियमित वेळेवर येऊन विद्यार्थ्यांना शिकविणे व नंतर इतर कामे करणे आहे. पण आजपर्यंत साडेतीन वर्षात कधीच मुख्याध्यापिका शाळेत वेळेवर आलेल्या नाहीत व कधीच विद्यार्थ्यांना शिकविले नाही. उलट उच्च श्रेणी मुख्याध्यापकाला शाळेत वेळेवर येण्याचे बंधन नाही,वर्ग घेण्याचे आणि शिकविण्याचेही काम नाही.असे सांगून आजपर्यंत पालकांची दिशाभूल करुन फसवणूक केली आहे. मुख्याध्यापिकेच्या उद्धट व गैरवर्तनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी
माजी उपसरपंच तथा माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य देवानंद राठोड चिकणी यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Copyright ©