Home यवतमाळ सिद्धार्थ मंडळ रामनगर च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात...

सिद्धार्थ मंडळ रामनगर च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी

31

संपादक सदानंद जाधव

सिद्धार्थ मंडळ रामनगर च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी

मी आज पदावर विराजमान आहे फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे.
तहसिलदार सुधाकर राठोड याचे प्रतिपादन

दिग्रस
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सिद्धार्थ मंडळ रामनगर व रास्त भाव दुकानदार संघटना दिग्रस तालुका चे वतीने विश्र्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती साजरी करण्यात करण्यात आली. पंचशील बुध्द विहार रामनगर येथे दि. १४एप्रिल २०२२ रोजी गुरुवारी विविध
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजारोहण – श्री सुधाकर राठोड साहेब तहसीलदार दिग्रस. यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून दिग्रस चे ठाणेदार
श्री पांडुराजी फाडे साहेब, पोलीस रवी जगताप साहेब, मानकर साहेब, लाखकर साहेब, टाले साहेब श्री बाबुसिंग जाधव , नरले बाबु, श्री अभय इंगळे पत्रकार, डी.डी. बडोले समाजकल्याण (बार्टी) सौ. वनीता राठोड सरपंच ,सलीम शेख सर, प्रल्हाद कोरडे अध्यक्ष दिग्रस तालुका रास्त भाव दुकानदार संघटना. धनंजय मस्के सर . सुरेश बाहेकर सर मुख्याध्यापक जि प शाळा रामनगर .यांची प्रामुख्याने उपस्थीती होती.दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सिद्धार्थ मंडळ रामनगर च्या वतीने गरजवंत विद्यार्थ्यांना बुक आणी पेन वाटप मान्यवराचे शुभ हस्ते करण्यात आले.
रोग निदान शिबिराचे आयोजन
सिद्धार्थ मंडळ रामनगर आणि जनसेवा आरोग्य शिक्षण प्रसारक मंडळ दिग्रस च्या वतीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी ५.३० वाजता पंचशील बुद्ध विहार येथे मोफत रुग्णाची तपासणी करण्यात आलीआणि रुग्णाला निशुल्क औषधे सुद्धा वाटप करण्यात आले या शिबिरात डॉक्टर डॉ श्रीकृष्ण खोलगडे, डॉ भारत दुधे, डॉ धंनजय खोलगडे, डॉ यशवंत राऊत, डॉ मिलींद पदमावर, यांनी सेवा प्रदान केली

Copyright ©