जिल्हा परिषद यवतमाळ च्या प्रा शिक्षणाधिकारी प्ची तक्रार शिक्षण संचालक पुणे यांच्या दरबारी
शासन निर्णय दिनांक २८ मार्च २००५ अन्वये कायद्याचे उल्लंघन केल्या बाबत तक्रार
शासन सेवेत गेल्या १५ ते २० वर्षांपासून कार्यरत असलेले मुरब्बी शिक्षणाधिकारी यांनी कायद्याचा भंग करून शासनापासून माहिती लपवून स्वतः सह अर्धांगिनीला सुद्धा कंत्राटी विशेष शिक्षिका म्हणून शिक्षण विभागातच कार्यरत केले असल्याचे तक्रार कर्त्याने तक्रारीत नमूद केले आहे.शासन निर्णय दिनांक २८ मार्च २००५ अन्वये दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या कोणत्याही वर्ग १ ते ४ पर्यंतच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास २८ मार्च २००५ नंतर तिसरे अपत्य असल्यास शासन सेवेत कार्यरत राहता येत नाही.मात्र यवतमाळ च्या शिक्षण अधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग करून व शासना पासून माहिती लपवून स्वतः सह पत्नी ला सुद्धा शिक्षण विभागात कार्यरत ठेवल्याचे तक्रारीत म्हटले काहे. या शिक्षण अधिकाऱ्याचे तिसरे अपत्य हे मुलगा असून याचा दिनांक २८/०७ /२००७ चा असून या पूर्वी दोन मुली असल्याचे तक्रारीत स्पस्ट उल्लेख आहे दोन्ही मुली मुला पेक्षा मोठया असल्याने शासन निर्णय २८ मार्च २००५ या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षणाधिकारी व त्यांच्या पत्नीला बडतर्फ करावे अशी तक्रारीत म्हटले आहे.प्रत्येक्षात तीन अपत्य असून आपल्याला दोनच अपत्य आहेत अशी खोटी माहिती देऊन लबाडीने शासकीय नोकरीत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यावर पुणे येथील जिल्हा कारागृहाच्या (वर्ग २ ) अधीक्षिका व कोल्हापूर येथील एका शिक्षकाला बडतर्फ करण्यात आले होते तशीच कार्यवाही यवतमाळ जिल्ह्यातील प्रा शिक्षण अधिकारी यांच्यावर होईल का या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
कर्मश
