सावळी सदोबा प्रतिनिधी आसिफ खान
सावळी सदोबा येथे सर्वधर्मीय सम्मेलन संपन्न
आज सावळी सदोबा येथे यवतमाळ जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने सर्वधर्मीय सम्मेलन घेण्यात आले.यवतमाळ जिल्ह्यांमध्ये सामाजिक, धार्मिक, जातीय सलोखा, सद्भावना, संवाद, बंधूभाव निर्माण झाला पाहिजे या विचाराने आजचे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या संमेलनात बौद्ध, मुस्लिम, हिंदू धर्मातील धर्मगुरू आणि धनगर,कुणबी(मराठ),बंजारा, आदिवासी,गोवारी, आणि सावळी सर्कल मधील सर्व जाती धर्माचे प्रतिनिधि ,राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या संमेलनात अध्यक्ष स्थानी यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक मा दिलीप पाटील भुजबळ तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा विभाग प्रदिप पाटील,घाटंजी विभागाचे पोलिस निरीक्षक मनिष दिवटे हे होते मार्गदर्शक म्हणून भंते प्राध्यापक सुमेध बोधी, मौलाना सिराजजी,कनिराम बापू महाराज हे होते लोकनेते बाळासाहेब शिंदे,जि.प.सदस्य प्रकाश राठोड,माजी जि.प.उपाध्यक्ष मुबारक तंवर, प्रल्हाद पाटील जगताप, प्रल्हाद गावंडे, मनोहर बसावे, शेषराव मुनेश्वर सिताराम राठोड,विजय राऊत,अहेमद खान,सरपंच अंजनाबाई गेडाम,विरपत्नी कुंतीताई आडे,राजु राऊत,सोनबाजी मंगाम हे होते आणि सावळी सदोबा सर्कल मधील बहुसंख्येने महिला, पुरुष उपस्थित होते.
या संमेलनाची सुरुवात भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाले.सावळी सर्कलमधील सर्वच गावातील नागरिकांनी, संघटना,पत्रकार बंधुंनी,सर्व धर्मातील लोकांनी यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक मा दिलीप पाटील भुजबळ यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले संमेलनात पुढे बोलताना भंते प्राध्यापक सुमेध बोधी म्हणाले जगामध्ये जगण्याला मैत्री,करुणा,समता, स्वतंत्र, बंधुभाव, एकात्मता ही बुद्धाची शिकवण हवी आज जर आपण आपल्या जिवणात या शिकवनीचा अमल केला तर भारत देश बलवान आणि महान होईल,हिंसा करू नका,चोरी करू नका,पर स्त्री मातेसमान माना,व्यसन करू नका,दान करा,त्याग करा,सेवा करा,मदत करा,सत्य बोला असे मौल्यवान मार्गदर्शन केले, त्यानंतर मौलाना सिराजजी यांनी सांगितले की सावळी हे गाव एकमेकांना जोडणार आहे, आपल्याला सर्वांना ज्यांनी बनवल त्यांनी आपल्या मध्ये कोणताच भेदभाव ठेवला नाही तर मग आपण का भेदभाव करायचा , सर्व धर्मातील लोकांनी आपापले सण-उत्सव आपल्या परंपरेनुसार साजरे केले पाहीजेत आणि सर्वानी बंधुभावाने एकत्र राहावे असे आवाहन केले.यापुढे हिंदू धर्मातील आणि बंजारा समाजातील प्रतिनिधी म्हणून धनराज राठोड यांनी सांगितले की आपण सारे भाऊ भाऊ गुण्यागोविंदाने एकत्र राहू,जात पात धर्म असा भेदभाव करु नका, सर्वांनी सहकार्याने रहा असा संदेश दिला, कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात भुजबळ साहेबांनी सर्व धर्मातील लोकांना त्यांच्या धर्मातील अभिवादन करण्याच्या पद्धतीने अभिवादन करुन उपस्थितांची मने जिंकली पुढे बोलतांना ते म्हणाले कि एप्रिल महिन्यात २ तारखेपासून धार्मिक सण-उत्सव, महापुरुषांची जयंती असा भरगच्च कार्यक्रम असतानी कोणताच अनूचित प्रकार घडला नाही सर्वांनी शुभ संदेश देण्याचे काम केले, मर्यादा पुरुषोत्तम रामाबद्दल गौरवौद्गार काढले, पवित्र रमजान महिन्याचे पावित्र्य समजून सांगितले, गुढीपाडवा, हनुमान जयंती,ईस्टर फ्रायडे,महाविर जयंती आणि १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर याची जयंती बद्दल मार्गदर्शन केले की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशातील सर्व धर्मातील महिला,युवक, पुरुषांना सारखे अधिकार दिले प्रत्येक व्यक्तीला आपल मत मांडण्याचा, अभिव्यक्त होण्याचा,धर्मानूसार आचरण करण्याची मूभा दिली आहे प्रत्येक व्यक्तीला एक मत एक मुल्य हा अधिकार महिला आणि पुरुषला सारखाच दिला आहे, अनेक जाती-धर्माचे लोका एकत्र ठेवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे अमूल्य संविधाना दिल त्यामुळे सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतघ्न असायला पाहिजे, आपल्यावर त्यांचे अनंत उपकार आहे कारण बाबासाहेब झाले नसते त्यांनी संविधानात हक्क अधिकार दिले नसते तर मी सुद्धा आज पोलिस अधीक्षक झालो नसतो असे अभिमानाने सांगितले शेवटी बोलताना सांगितले की सावळी हे गाव यवतमाळ जिल्ह्याचे ह्रुद्यस्थान आहे या गावात जसा सामाजिक,धार्मिक, जातीय सलोखा,सद्भावना,समानता दिसली तशी इतर कुठ पाहायला नाही मिळाली तरी सर्वांनी हाच एकोपा सामाजिक स्वास्थ्य कायम ठेवाव हि उपस्थित सर्वांकडून अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण तर आभार पोलिस दुरक्षेत्र सावळी सदोबा चे प्रभारी गजानन गजभारे यांनी केले,या मेळाव्याला कमी वेळात यशस्वी करण्यासाठी पारवा पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी वर्गानी अथक परिश्रम घेतले आणि सावळी सर्कल मधील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन संमेलन यशस्वी केले.
