Home यवतमाळ संकल्प प्लास्टिक निर्मूलन शाळेचा चवथा रवीवार

संकल्प प्लास्टिक निर्मूलन शाळेचा चवथा रवीवार

32

संकल्प प्लास्टिक निर्मूलन शाळेचा चवथा रवीवार

यवतमाळ शहरात नगर प्रशासनाच्या कर्तव्यदक्ष प्रशासक व मुख्याधिकारी माधुरिताई मडावी ह्यांनी प्लास्टिक मुक्त शहराची संकल्पना मांडली,त्यांच्या संकल्पनेला हातभार लागावा व सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी ह्या उदात्त हेतूने दर रविवारी शहरातील ज्या सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक चा कचरा मोठ्या प्रमाणात आढळतो त्या ठिकाणी सकाळी 7 ते 9 ह्या वेळेत इको लव्हर ग्रुप,संकल्प फाउंडेशन, संकल्प वनिता वाहिनी व एक हात मदतीचा वन्य जीवासाठी ह्या संस्थांच्या मदतीने श्रमदान केल्या जाते,आज सकाळी शहरातील वर्दळीच्या बसस्थानक परिसरात प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले,तब्बल 14 बॅग प्लास्टिक चे निर्मूलन करून नगर प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले,पुढच्या रविवारपासून श्रमदान झालेल्या ठिकाणी हा परिसर प्लास्टिक मुक्त असून,ह्या ठिकाणी प्लास्टिक वापरू नये,वापरल्यास दंड आकारण्यात येईल अशा आशयाचे फलके नगर परिषद मुख्याधिकारी ह्यांच्या परवानगीने लावल्यास लोकांमध्ये जनजागृती होईल त्या करिता मा मडावी म्याडमला तशी विनंती संकल्प फाउंडेशन च्या वतीने करण्यात येईल,आजच्या श्रमदानाकरिता संकल्प फाउंडेशन चे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, उपाध्यक्ष अनिल तांबेकर,सहसचिव रवी माहुरकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवी ठाकूर,जेष्ठ सदस्य व माजी सैनिक मनोज तामगाडगे,संकल्प कृषी मित्र अमोल चौधरी,राजू देशमुख,अरुण चंदरे,महादेव काचोरे,दिनेश बनकर,संकल्प वनिता वाहिनीच्या पूनम शेंडे,संगीता टिप्रमवार, तर एक हात मदतीचा वन्य जीवासाठी चे दिनेश तिवाडे,महेश सीडाम उपस्थित होते

Copyright ©