Home यवतमाळ दिग्रस शहरात भगवान महावीर जन्मोत्सव उत्साहात साजरा

दिग्रस शहरात भगवान महावीर जन्मोत्सव उत्साहात साजरा

31

संपादक सदानंद जाधव

दिग्रस शहरात भगवान महावीर जन्मोत्सव उत्साहात साजरा

दिग्रस शहरात भगवान महावीर यांचा जन्मोत्सव सकल जैन समाजाच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यानिमीत्य स्थानिक श्री. दुर्गामाता चौकातील श्री. चिंतामणी पार्श्वनाथ जैन श्वेतांम्बर जैन मंदीरातून आकर्षकरित्या सजविलेल्या रथातून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा वाजत गाजत काढण्यात आली. शोभायात्रेत विवीध झाँक्या साकारण्यात आल्या होत्या. मिरवणुकीच्या मार्गावर विविध संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक संस्थाच्या वतीने मार्गात शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
शोभायात्रेच्या मार्गात भाविकांसाठी विविध ठिकाणी थंडपेयाची व्यवस्था करण्यात आली होती व मिरवणुक मार्गात प्रसादाचे वितरण करण्यात आले. शोभायात्रेचा समारोप दुर्गामाता चौकात करण्यात आला. यानिमित्त जैन आराधना सभागृहात गढी मैदान येथे सकल जैन समाजाला डॉ. प्रदीप मेहता,व सौ.अल्फा रोकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बालकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड.रविंद्र कोठारी यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला. शहरातील सर्व जैन मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश मेहता, ऍड. रवींद्र कोठारी, भरत ओसवाल, डॉ. प्रदीप मेहता, स्वरुपचंद बोरा, प्रदीप सिंगवी, दिपक कोठारी, राजेन्द्र सिंगवी, श्याम कांकरिया, सुंदर गड्डा, भाईलाल गड्डा, यतीन गड्डा, डॉ. प्रशांत रोकडे, सुशील झांबड, पंकज गोसर, ऍड.राजेंद्र कोठारी, विनय सिसोदिया, शांतीलाल ओसलाल, श्रीपाल सिसोदिया, राजु बोरा, संजय सिसोदिया, अजय कोठारी, गुलाब वोरा, दता व्हंडाळे, किशोर बोरा, कपील बोरंदिया, सुमीत सिंगवी, हर्षील शहा, लहर काराणी, शैलेश पीर, अमीत गुंदेचा, दिनेश झांबड, आनंद जैन आदीसह सकल जैन समाज व सकल जैन समाज महीला मंडळाने अथक परीश्रम घेतले.

Copyright ©