Home यवतमाळ माजी मंत्री संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

माजी मंत्री संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

11

संपादक सदानंद जाधव

माजी मंत्री संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२० एप्रिल २०२२ रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संजय भाऊ देशमुख मित्र मंडळ,श्री दुर्गामाता बहुउद्देशीय क्रीडा व शैक्षणिक संस्था व पुसद येथील मेडिकेयर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने नवीन बस स्थानक समोरील ईश्वर देशमुख फार्मसी कॉलेजमध्ये दुपारी बुधवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत शिबिर होणार आहे.
या शिबिरामध्ये तपासणी व गरज भासल्यास मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येईल.आवश्यकतेनुसार ईसीजी देखील करण्यात येईल सदर शिबिरात डॉ.विरेन पापळकर,डॉ.सतीश चिद्दरवार,डॉ.संजय अग्रवाल,डॉ.हर्षल येरकाडे,डॉ.राहुल जाधव ,डॉ.सुजित चिलकर,डॉ.सचिन थोरकर,डॉ.आनंद कोमावार, डॉ.ललित जाधव,डॉ.अंकुर जैन,डॉ.अंकित जैन,डॉ.प्रतीक जयस्वाल, डॉ.अर्पिता पटेल,डॉ.रक्षदा चौधरी,डॉ.मोहिनी काळे,डॉ.जयनेश धाडूक आदी सेवा देणार आहे.आवश्यक रुग्णांचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार असून सर्वांनी मूळ कागदपत्रे व जुने रिपोर्ट फाईल सोबत ठेवावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.तरी गरजू रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

Copyright ©