दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी हनुमान जन्मोत्सव उत्साहात
किन्ही (यवतमाळ) युवक पुढाकार घेऊन हनुमान जन्मोत्सव भावपूर्ण आनंदात साजरा करण्यात आला.सुंदर अशी मंदिराची फुलाने सजावट शिवगण परिवार तर्फे करण्यात आली होती.विशेष म्हणजे किन्ही गावातील हनुमान जी ची मुर्ती यवतमाळ जिल्ह्यातील सर्वांत उंच मोठी मुर्ती आहे.आणि या गावातील लोकांचे जागृत दैवत असल्याने या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात ये जा असल्याने या मंदिराचे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.उत्सव विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येतो यात रात्री भजन नामस्मरण, पहाटे अभिषेक विधी व हनुमान चालिसा पठण करीत पुजा करून साजरा करण्यात आला.यावेळी गावचे प्रतिष्ठित व्यक्ति आणि शिवगण परिवार उपस्थित होते.त्यानंतर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
