Home यवतमाळ माझी वसुंधरा सायकल रॅलीत संकल्पचा सहभाग

माझी वसुंधरा सायकल रॅलीत संकल्पचा सहभाग

9

माझी वसुंधरा सायकल रॅलीत संकल्पचा सहभाग

दिनांक 15 एप्रिल ला सकाळी ठीक 6 वाजता आझाद मैदान येथून सुरवात झालेल्या सायकल रॅली मध्ये संकल्प फाउंडेशन च्या सदस्यांनी आपला सहभाग नोंदवित जिल्हा प्रशासनाच्या पुन्हा एका उपक्रमात सक्रियता दाखविली,यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल एडगे ह्यांच्या आव्हानानंतर,नगर प्रशासनाच्या नियोजनात माझी वसुंधरा अभियानांतर्गत यवतमाळ शहरातून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,जिल्हा पोलीस अधीक्षक ,निवासी उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,अनेक कर्मचारी,व यवतमाळ येथील विविध सामाजिक संघटनांच्या सोबत संकल्प फाउंडेशन ने आपला उत्स्फूर्त सहभाग ह्यावेळी नोंदविला,तब्बल 10 ते 12 किलोमीटर सायकल रॅली संपूर्ण यवतमाळ शहरातून फिरत असतांना नागरिकांना पर्यावरण,वृक्षारोपण,पाणी अडवा, पाणी जिरवा,प्लास्टिक निर्मूलन संबंधात जनजागृती करीत होते,मुख्यत्वे संकल्प वनिता वाहिनीच्या पूनम शेंडे,संगीता टिप्रमवार, निकिता बाविस्कर व सर्वात छोटी कु कश्यपी दोंदल,ह्यांनी सुरवातीपासून ते समाप्ती पर्यंत तब्बल 12 की मी सायकल चालविली, ह्यावेळी प्रशासनाच्या वतीने संकल्प फाउंडेशन चा सत्कार करण्यात आला,रॅली च्या दरम्यान प्रशासनाच्या वतीने केळी व पेपरमिंट गोळ्यांचे वारंवार वितरण करण्यात आले संकल्प फाउंडेशन च्या वतीने अध्यक्ष प्रलय टिप्रमवार,उपाध्यक्ष अनिल तांबेकर,सहसचिव,रवी माहुरकर,संयोजक गजेंद्र उन्हाळे,शहराध्यक्ष विनोद दोंदल,मनोज तामगाडगे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य आशिष महल्ले,रवी ठाकूर,प्रसिद्धी प्रमुख सागर तुमसरे,निलेश ठोंबरे,अमोल चौधरी,राजू देशमुख,राहुल दाभाडकर,शिवम चव्हाण,अथर्व भागानगर कर,यश रोकडे,गणेश उप्पलवार,ह्यांनी तर संकल्प वनिता वाहिनीच्या पूनम शेंडे,संगीता टिप्रमवार, निकिता बाविस्कर,कश्यपी दोंदल ह्यांनी उत्फुर्त सहभाग नोंदविला

Copyright ©