Home यवतमाळ सावळी सर्कल मिळून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक

सावळी सर्कल मिळून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक

9

सदोबा सावळी प्रतिनिधी आसिफ खान

सावळी सर्कल मिळून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक

आर्णी तालुक्यातील सावळी (स) येथे भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2022 सावळी(स) सर्कल च्या वतीने भव्य दिव्य अशी मिरवणुक काढून जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सावळी (स) 2022 च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आदिवासी गोवारी शहिद स्मारक, अहिल्याबाई होळकर,बिरसा मुंडा, वसंतराव नाईक,अन्नाभाऊ साठे, शाहिद भगतसिंग या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.कोरोना महामारीमूळे गेली दोन वर्षे जयंती साजरी करण्यात आली नव्हती त्यामुळे यावर्षी सावळी सर्कल मधील २०-२५ गावातील समाज बांधवांनी मिळून एकत्र या मिरवणुकीच आयोजन केले होत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सावळी सर्कल समितीच्या वतीने अशी भावना रुजवण्यासाठी या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे झेंडे लावून समातेचा संदेश दिला.तसेच यावेळी मिरवणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा देखावा सादर करण्यात आला,या मिरवणुकीत प्रसिद्ध अमोल डिजे,लकी डिजेच्या तालावरती तरुणाई व महिला वर्ग आपला आनंद व्यक्त करत होते यावेळी जयभीम ‌… जयभीम…. जयभीम….एकच साहेब बाबासाहेब… बाबासाहेब अमर रहे…तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय… अहिल्याबाई होळकरांचा विजय असो,बिरसा मुंडा कि जय,संत सेवालाल महाराज कि जय,अन्नाभाऊ साठे कि जय,शहिद भगतसिंग अमर रहे,भिमा कोरेगाव केलं भिमा कोरेगाव च्या घोषणेने सावळी सदोबा गाव दणाणून गेले होते.

या मिरवणुकीत मुस्लिम,धनगर,बंजारा बांधवांनी शरबत वाटून बंधूभाव निर्माण केला.या मिरवणुकीला यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सावळी सर्कल च्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी खुप मेहनत घेतली आणि मिरवणूक वेळेवर सुरू करून वेळेवर समाप्त केली या मिरवणुकीसाठी सावळी सर्कल मधील बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Copyright ©