प्रताप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रताप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले.यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंचावर येऊन त्यांचे विचार मांडले.यात प्रामुख्याने रितीका परचाके, वैष्णवी केसकर,सुमेधा गुप्ता,कोमल सावसाकडे,स्नेहा खोडके, चैताली मेश्राम,संचिता सावसाकडे आदी विद्यार्थीनींनी बाबासाहेब यांचा संघर्षपट समोर ठेवून त्यांच्या सारखे पुस्तक प्रेम बाळगून, पुस्तकांशी मैत्री करून जिवनात प्रत्येक वाटेवर यश मिळवीता येते; असे सांगितले.
याप्रसंगी मंचावर प्रताप शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव घोडे, सचिव जयंतराव घोंगे, उपाध्यक्ष गोपाळराव खडसे, प्राचार्या मालीनी पाटणे, उपमुख्याध्यापक राम चिकणकर, पर्यवेक्षिका लता डेकाटे, प्रमुख वक्ते प्रशांत कडुकार आणि देवेंद्र आत्राम उपस्थित होते.
प्रमुख वक्त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे मनोज नगराळे आणि आभार प्रवीण मिरासे यांनी मानले.
यावेळी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.
