किशोर तिवारी यांचा २ एप्रिलचा २०२२चा यवतमाळ जिल्हा दौरा
महागाव तालुक्याचा माळवाकद पारधी बेड्यावर सरकार आपल्या दारी कार्यक्रम
दुपारी १ वाजता महागाव तालुक्याचा माळवाकद पारधी बेड्यावर मागील तीन महिन्यांपूर्वी आयोजीत साकार आपल्या दारी कार्यक्रमाचा पाठपुरावा तसेच पारधी समाजाच्या अन्यायाच्या बातम्यांची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने त्या तक्रारींचे निवारण तसेच जमिनीचे पट्टे ,जातीचे प्रमाण पत्र , अन्न ,आरोग्य व सामाजिक सुरक्षा ,वीज ,घरकुल,कृषी योजना , आदिवासी योजना या बाबत असलेल्या योजनांचा आढावा .
प्रशासन फासे पारधी समाजाविषयी सतत उदासीन असुन त्यांच्या मूलभूत समस्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य सुविधा यासुद्धा त्यांना उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत महाराष्ट्र सरकारने पारधी विकास कार्यक्रम प्रकल्प कार्यालय (आदिवासी विकास) यामार्फत लागू केला आहे मात्र भ्रष्ट्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याचे तीनतेरा केले आहे यावर पारधी समाजाच्या समस्या मुख्यमंत्र्याना सादर करण्यासाठी माळवाकद पारधी बेड्यावर सरकार आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे स्वतः करीत असुन या कार्यक्रमात प्रकल्प अधिकारी आदीवासी विकास ,मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद ,महसूल ,आरोग्य, कृषी,वन ,वीज ,भूसंपादन ,बांधकाम विभाग , सिचन विभाग ,सहकार प्रशासनाचे जिल्हास्तरीय अधिकारी सतत उपस्थित राहत नसुन आपले तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा देत नसल्याच्या तक्रारी येत असतात तरी जिल्हास्तरीय अधिकारी यांना प्रोटोकॉल लागू होत नसल्याचा अनुभव व शेतकरी तसेच आदीवासी यांच्या मुलभूत समस्यां सोडविण्यात रस नसल्याचे दिसते हा मस्तवालपणा नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सूचना द्याव्यात जर उपस्थित राहणे बंधनकारक नसल्यास तशी लेखी सूचना शेतकरी मिशन द्यावी
रात्री पांढरकवडा येथे मुक्काम
