Home यवतमाळ जिल्हा क्रिडा संकुलतर्फे जलतरण तलाव सुरू

जिल्हा क्रिडा संकुलतर्फे जलतरण तलाव सुरू

10

जिल्हा क्रिडा संकुलतर्फे जलतरण तलाव सुरू

यवतमाळ दि. 31 मार्च : जिल्हा क्रिडा संकुल समिती अंतर्गत आझाद मैदान, यवतमाळ, येथील जलतरण तलाव 1 एप्रिल 2022 पासून नियमितपणे 50 टक्के प्रवेश क्षमतेसह सुरू करण्यात येत आहे.

कोविड लसिकरण पुर्ण झालेल्या व्यक्तींनाच जलतरण तलावासाठी प्रवेश देण्यात येणार असून जलतरण तलाव सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सुरू राहील. तसेच सायंकाळी 4 ते 5 या वेळेत महिलांसाठी विशेष बॅच राहणार आहे.

जलतरण तलावात नियमित सराव व पोहण्याचा आनंद घेण्यास इच्छुक जलतरणपटू व नागरिकांनी आझाद मैदान येथील जलतरण तलावावर रितसर नोंदणी करून दिलेल्या वेळेनुसार आपला प्रवेश नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले आहे.

 

_______________________________________

 

‘परीक्षा पे चर्चा’

 

परिक्षेचा ताण व अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रधानमंत्री संबोधणार विद्यार्थ्यांना

 

1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण

 

यवतमाळ दि. 31 मार्च : येत्या 26 एप्रिल पासून सी.बी.एस.सी.बोर्डाच्या दहावी व बारावी च्या परिक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांवरील परिक्षेचा ताण व त्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांना संबोधीत करणार आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडीयमवर होणाऱ्या या कार्यक्रमाचे विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण होणार आहे.

जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय तसेच सी.बी.एस.सी.बोर्डचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य कमलाकर धोपटे यांनी केले आहे.

___________________________________

 

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या योजना मंजुरीसाठी शुल्क आकारणी नाही

खाजगी एजन्टच्या भुलथापास बळी न पडण्याचे आवाहन

 

यवतमाळ दि. 31 मार्च : महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयामार्फत विशेष घटक योजना (एस.ई.पी ) राबविण्यात येत असुन ही योजना संपुर्णपणे ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येते. या योजने अंतर्गत विविध उद्योगाचे ऑफलाईन अर्ज तालुका सचिव यांचे कार्यालयास घेउन नंतर त्यांची छाननी केली जाते. प्रकरणाची पडताळणी करून ते बँकेकडे ऑफलाईन पाठवली जातात. त्यासाठी या कार्यालयामार्फत कोणत्याही प्रकारचे शुल्क अथवा फी आकारण्यांत येत नाही.

या योजना मंजुर करून देण्यासाठी कोणत्याही खाजगी एजन्ट, संस्था वा एजन्सीची नेमणुक करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नावाचा गैरवापर करुन उद्योजक/कारागीर यांची प्रकरणे मंजुर करुन देतो असे सांगुन उद्योजकाकडुन त्या बदल्यात रक्कमेची मागणी करत असल्याचे आढळून आल्यास अशा ऐजन्टच्या भुलथापास बळी पडु नये, व नजीकच्या पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार देण्यात यावी. अधीक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४७९१ यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जी.आर. इंगळे यांनी केले आहे.

Copyright ©