Home यवतमाळ आंतरराष्ट्रीय महिला दिन

आंतरराष्ट्रीय महिला दिन

20

आंतरराष्ट्रीय महिला दिन

संकल्प फाउंडेशन च्या वतीने प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचा सन्मान

8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्थानिक संत गाडगेबाबा सभागृह,उज्वल नगर येथे प्रशासनात कार्यरत उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला,सोबतच शहरातील उपेक्षित पण कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या आपल्या संसाराचा गाडा हाकत आपल्या खडतर जीवनाचे मार्गक्रमण करणाऱ्या महिलांचा साडी व चोळी देऊन सौ ज्योती डब्बावार ह्यांच्या पुढाकाराने सत्कार करण्यात आला,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ अन्याय निवारण समिती यवतमाळ जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ क्रांती सागर राऊत ह्या होत्या,प्रेरणादायी,माँ जिजाऊ,अहिल्याबाई होळकर,लक्ष्मीबाई,रमाई,सावित्रीबाई फुले,सिंधूताई सपकाळ ह्यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून ह्या दिमाखदार सन्मान सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला,सन्मानित झालेल्या महिला अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा कौशल्य कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे,उपविभागीय जलसंधारण अधिकारी,सारिका पाटील,भरोसा सेल व दामिनी पथक प्रमुख विजया पंधरे,मंडळ कृषी अधिकारी,प्रांजली कोरेवार, वीस वर्षीय सरपंचां दीपाली नाचपेलवार ह्यांचा समावेश होता,ह्यावेळी कु स्वराली गजेंद्र उन्हाळे ह्या चिमुकलीने राणी लक्ष्मीबाईची वेशभूषा साकारली असल्यामुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती, कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन संकल्प वनिता वाहिनीच्या उपाध्यक्षा वर्षा सरागे,प्रास्ताविक सचिव वैशाली पिसाळकर तर आभार प्रदर्शन संकल्प फाउंडेशन चे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार ह्यांनी व्यक्त केले,ह्यावेळी कार्यक्रमाला शेकडो महिलांच्या उपस्थितीने सभागृह तुडुंब भरले होते,संकल्प वनिता वाहिनीच्या सुचिता अरसोड,सविता पोदुतवार,शीला खर्चे, पूनम शेंडे,शीला तंबाखे,निकिता बाविस्कर,संगीता टिप्रमवार, अश्विनी खुळे, स्नेहल रेचे,सुनीता शेळके,सुजाता नराळे,वर्षा गावंडे,किरण दीघडे,प्रणिता गिरी,स्वाती तलमले,प्रेमा काळे,सरिता यादव,शारदा पाटील,ज्योती उन्हाळे,संगीता माहुरकर,शैलजा रजनलवार ह्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सोबतीला संकल्प फाउंडेशन चे वसंत शेळके,विनोद नराळे,अनिल तांबेकर,रवी माहुरकर,प्रकाश दीघडे, गजेंद्र उन्हाळे,नितेश यादव,राजू गावंडे,निकेश तिरपुडे,प्रशांत एम्बडवार,आशिष महल्ले,बालाजी गरूडकर,विनोद दोंदल,प्रशांत बोराडे,सागर तुमसरे,आकाश भारती,सचिन कोटनाके,तुषार गिरी व अन्य सदस्य उपस्थित होते

Copyright ©