Home यवतमाळ महाराष्ट्र पेंटर संघटना अंतर्गत ऑल पेंटर्स संघटना, यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी

महाराष्ट्र पेंटर संघटना अंतर्गत ऑल पेंटर्स संघटना, यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी

15

महाराष्ट्र पेंटर संघटना अंतर्गत ऑल पेंटर्स संघटना, यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी

रविवार दिनांक 06/03/2022 ला जाहीर झाली.
या डिजिटल युगात फ्लेक्स बॅनर प्रिंटींगमुळे हाताने पेंटींग करणार्या सर्वच कलाकारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे, डिजिटल शाळांच्या कामात ठेकेदारी घुसल्यामुळे मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने सर्वसामान्य पेंटर हतबल झाला आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस च्या (POP) वापरामुळे मुर्तिकारांच्या हातच्या मुर्तिकामाला किंमत उरली नाही.
आजच्या महागाईच्या काळात
ॲडव्हरटाईजींग साठी वाॅल पेंटर यांना कंपण्या ४/- रुपये फुटाच्या वर भाव देत नसल्यामुळे पेंटर वर उपासमारीची वेळ आली आहे.
ईतर कलाकारांना जसे भजनी मंडळ, कामगार, गायदेखील कलाकार यांना जशी शासना कडुन मदत मिळते त्याच प्रमाणे पेंटर लोकांना सुद्धा शासनाकडुन मदत मिळावी अशी आशा सर्वच हवालदिल झालेले पेंटर बांधव करित आहे, साठ वर्षांनंतर व्रुद्ध पेंशन योजना लागु व्हावं याची अपेक्षा करण्यात आली, एखाद्या पेंटरचा काम करित असतांना अपघात झाल्यास त्याला शासनाची अर्थीक मदत मिळावी, याच उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व पेंटर संघटीत होऊन शासन दरबारी आपल्या गरजा मांडण्या करिता व संघटना परिपक्व करण्या करिता जिल्हा व तालुका लेवलवर पेंटर शाखा अधिक बळकट व्हावं याच उद्देशाने महाराष्ट्र पेंटर संघटना अंतर्गत ऑल पेंटर्स संघटना यवतमाळ जिल्हा या नावाने शाखा जाहीर करण्यात आले.
ऑल पेंटर्स संघटना यवतमाळ जिल्हा या कार्यकारिणीत उपस्थित सर्वानुमते खाली दर्शविलेल्या पदाधिकारीची निवड व जाहिर करण्यात आले.
श्री.राजु गझलवार.. अध्यक्ष श्री.सुनिल चव्हाण..उपाध्यक्ष श्री.चंक्रधर घुले..उपाध्यक्ष श्री.दिपक सुकळकर ..कार्याध्यक्ष श्री.सागर झोंबाड.. कोषाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर चौधरी..सह.कोषाध्यक्ष
श्री.राजु वंजारे..सचिव श्री.योगीराज भोवते..सह. सचिव श्री.मधुकरराव मेश्राम. प्रसिध्दी प्रमुख
श्री.विजय इंगळे..संघटक श्री.जावेद पेंटर आर्णी.. विशिष्ट सल्लागार सदस्य उल्हास गोलाईत, राजु चौकडे, शाम गझलवार, किशोर सालपे, प्रदिपराव गिरी, अनिल जाधव, संजय भगत, गौतम बागेश्वर, ज्ञानेश्वर सोनटक्के, जमना पेंटर, राज पेंटर, अनिल देवतळे, जुबेर शेख, प्रविण राजुरवार, रामभाऊ गजभिये, रामेश्वर पेंटर, दलीत पेंटर, सुरज पेंटर, जे. के. पेंटर, संजय रणखांबे, अनिल देवतळे, निकोशे पेंटर, सालपे पेंटर, शिकरे पेंटर इत्यादी मंडळी उपस्थित होते.

Copyright ©