Home यवतमाळ संकल्प फाउंडेशन च्या वतीने गरजूंना जुन्या कपड्यांचे वितरण

संकल्प फाउंडेशन च्या वतीने गरजूंना जुन्या कपड्यांचे वितरण

19

संकल्प फाउंडेशन च्या वतीने गरजूंना जुन्या कपड्यांचे वितरण

आज महिला दिनाचे औचित्य साधून व मुंगसाजी माऊली च्या पुण्यतिथी निमित्ताने आज संकल्प फाउंडेशन ची टीम कपडे वितरण कार्यक्रमाकरिता सकाळी 11 वाजता धामणगाव देव येथे रवाना झाली होती,यवतमाळ करांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत वापरण्यायोग्य कपडे आमच्याकडे सुपूर्द केले होते,संकल्प फाउंडेशन चे मार्गदर्शक रमेश राऊत ह्यांच्या नेतृत्वात राजाभाऊ कठाळे, वैभव चवरे, इंगोले ह्यांनी धामणगाव देव येथे जाऊन गरजू ना हे कपडे वितरित केले, माणसाच्या अन्न, वस्त्र व निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत त्यातील महत्वाची गरज वस्त्र आहे,ग्रामीण भागात अशे अनेक कुटुंब आहेत की त्यांना कपड्याची चणचण भासते,ह्या संकल्पनेतून संकल्प फाउंडेशन यवतमाळ करांना आपल्या कडील वापरण्यायोग्य कपडे देण्याचे आव्हान करतात व ह्याला साद म्हणून अनेक प्रकारचे कपडे गोळा होतात, आणि ह्या गोळा झालेल्या कपड्यांचा सदुपयोग व्हावा ह्या हेतूने हे कपडे मेळघाट,दुर्गम भाग,अश्या ठिकाणी संकल्प फाउंडेशन पोहचवून देते,गरजू लोकही आनंदाने ह्या कपड्याचा स्वीकार करतात ,हा अभिनव उपक्रम संकल्प फाउंडेशन च्या माध्यमातून मागील 3 वर्षांपासून रमेश राऊत ह्यांच्या नेतृत्वात सुरू आहे

Copyright ©