जोडमोहा वार्ड क्रमांक १ मध्ये स्वखर्चाने नाली उपसा करतांना नागरिक
जोडमोहा ग्रामपंचायत बनली शोभेची वस्तू
जोडमोहा येथे वार्ड क्रमांक १मध्ये गावाच्या मधोमध नाली ने घाणीचे साम्राज पसरले असून ग्राम पंचायत ह्या कडे दुर्लक्ष करीत आहे .स्वच्छ भारत निर्माण करण्याचे स्वप्न खुल्या डोळ्याने पाहत असणाऱ्या शासनाच्या धोरणाचा खेळ खंडोबा केल्याचा प्रत्यक्ष नमुना जोडमोहा ग्राम पंचायत वार्ड क्रमांक १ मध्ये बघावयास मिळत असून अनेक रोग राईना आमंत्रण देणारे धोरण सरपंच राबवीत असल्याचे दिसून येत आहे गेल्या अनेक दिवसा पासून जोडमोहा येथे वार्ड क्रमांक १ मधील नालीचा उपसा करण्यासाठी वार्डातील नागरिकांनी वारंवार सूचना दिल्या असून ह्या नाली कडे कोणतेच सदस्य लक्ष सुध्दा देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे .नळ योजनेच्या विहिरी मध्ये ब्लिचिंग पावडर न वापरता नळ योजनेची पाईलाईन जागोजागी फुटल्याने त्या व्दारे दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे .डासाची संख्या प्रचंड वाढली असून ह्या कडे सातत्याने दुर्लक्ष करणारी ग्राम पंचायत रोगराई ना आमंत्रित करीत असून निष्पाप ग्रामस्थांना रोग राईचा सामना करावा लागत आहे .ग्राम पंचायत प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे वार्ड क्रमांक १मधील नागरिक रोष व्यक्त करीत आहे तरी वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का असा प्रश्न निर्माण होत आहे.
