दि.16 मार्चला अंशकालीन स्त्री-परिचर कृती समीतीचा मुंबई मंत्रालयावर मोर्चा
यवतमाळ:- महाराष्ट्र राज्य अंशकालीन स्त्री-परिचर संघटनांच्या कृती समीतीची झुम मीटींग नुकतीच संपन्न झाली आयटक सह अनेक संघटनाचे प्रतिनिधीनी चर्चा करून जिल्हा परिषदे मार्फत मागण्याचे निवेदन मा.आरोग्य मंत्री व मा.आरोग्य सचीवांना पाठवावे तसेच दि.१६ मार्च २०२२ रोजी मुंबई मंत्रालयावर अंशकालीन स्त्री-परिचरांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन मोर्चा काढण्यात यावा याबात चर्चे अंती एकमत करून मोर्चा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागण्या : अंशकालीन स्त्री-परिचरांना दरमहा एकत्रीत किमान वेतन रू. २१०००/– मानधन / वेतन द्या , जि.प.आरोग्य विभागात कायम करा व पेन्शन द्या.,त्यांच्या वारसांना त्यांच्या जागेवर घेण्यात यावे , त्यांना रजा सुट्याचा लाभ द्यावा., त्यांना ड्रेस कोड (गणवेश) व ओळख पत्र द्या. इत्यादी मागण्यांना घेऊन मोर्चा आंदोलन होणार आहे तरी यवतमाळ जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री-परिचरांनी जवळच्या रेल्वे स्टेशन वरून ज्यास्तीत ज्यास्त संखेने आझाद मैदान मुंबई येथे दि.१६ मोर्चाला सकाळी ११ वाजता पोहोचावे असे आवाहन कॉ.दिवाकर नागपुरे जिल्हा सचिव यांनी केले आहे
