सावळी सदोबा प्रतिनिधी आसिफ खान
खडका येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
आर्णी तालुक्यातील खडका या गावी मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैल चित्राला यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर व आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नुनेश्वर आडे यांच्या हस्ते हार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सरपंच क्रिष्णा किनाके , माजी सरपंच संतोष गेडाम, देवराव गिनगोले, अतुल म्हटले , विजय गिनगोले, गजानन गिनगोले, दत्ता गिनगोले, शिवाजी कुमरे, सिताराम घोडाम, विलास गेडाम, मनीष महले , साहेबराव महले ,प्रतिक चांदेकर ,संदिप कांबळे, सोपानराव वाकोडे , दिलीप गवळे , बंडू बावणे, गजानन महले यांचेसह गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.
शिवजयंतीचे आयोजन शिवजयंती समितीचे अक्षय शिरपुरकर , वैभव कांबळे, रवींद्र लांडगे, आशिष वाघाडे, सत्यम महले, विशाल लांडगे, सचिन टापरे , अजय लांडगे , प्रतिक महले , अमोल बावणे , गणेश शिरपूरकर , अभिजीत गिनगोले , यांनी शिवजयंती कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास फार महत्त्वाची भूमिका पार पाडली. शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैभव कांबळे यांनी केले.
शिवजयंतीच्या निमित्ताने खडका गावांमध्ये वाजत गाजत शांततेत भव्य मिरवणूक युवकांनी काढली होती.
