Home यवतमाळ पांढरकवडा येथे शांतता समिती बैठक संपन्न

पांढरकवडा येथे शांतता समिती बैठक संपन्न

11

 

 प्रतिनिधी सागर मुडे

पांढरकवडा येथे शांतता समिती बैठक संपन्न

यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षकांची  उपस्थिती

प्रतिनिधी पांढरकवडा सागर मुडे:- पांढरकवडा तालुक्यातील ग्रामीण भागात, येणाऱ्या काळातील उत्सवात जातीत व धार्मिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या मुख्य उद्देशाने, गुरूवार, 17 फेब्रुवारीला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मुख्य मार्गदर्शनात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. येणाऱ्या १९

फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव निमित्ताने शांतता समितीची बैठक येथील पोलीस ठाण्याच्या प्रांगणात घेण्यात आली होती.उत्सवा निमित्त निघणारी रॅली, मिरवणूक व अभिवादन सभेसाठी शासनाने दिलेले निर्देश यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी स्पष्ट बोलून दाखविले, असून प्रत्येक उत्सव हे कायद्याच्या चाकोरीत साजरे करा, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले ,यावेळी पांढरकवडा पोलीस  उपविभागीय अधिकारी , प्रदीप पाटील, ठाणेदार जगदीश मंडळवार पांढरकवडा नगरीच्या नगराध्यक्षा नहाते मैडम मुख्याधिकारी नगरपरिषद राजु मोटेम्वार, नायब तहसीलदार बेज, महावितरण चे अधीक्षक अभियंता नरेंद कटारे , सुबोथ काळपा, जेष्ठ नागरिक नागरिक नगरसेवक  पोलीस पाटील पत्रकार हे उपस्थित होते.

उत्सवा दरम्यान अडथळे, उत्सवा दरम्यान शासनाची मदत मिळावी या संदर्भात आप आपले विचार व्यक्त केले.यावेळी शांतता समितीचे सदस्य, पत्रकार, शिव जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शासनाने ज्या गाईड लाईन्स दिल्या त्याचे अनुकरण करा

 

नुकत्याच शासनाने शिव जयंती उत्सवा निमित्त नविन गाईड लाईन्स दिल्या आहेत, त्यात असे नमुद केले आहे की, कोणत्याही शोभायात्रा, कोणत्याही मिरवणूका काढण्यात येऊ नये, म्हणून आयोजन समितीला विनंती आहे की, पोलीस ठाण्याकडून शासनाच्या आदेशानुसार नोटीस दिल्या जातील त्याचे अनुपालन करतांना त्यात कश्या पध्दतीने कार्यक्रम बसवता येतील असे नियोजन करा, जो कार्यक्रम राहणार आहे, तो केबल नेटवर्क द्वारे, शोसल मिडीया द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा, कारण आपल्याला पाचशेच्या वर जमाव करता येणार नाही परंतू या पाचशेवर किती शून्य लावा तेवढ्या नागरीकां पर्यंत आपण ऑनलाईन द्वारे ,समाज माध्यमांद्वारे , केबल नेटवर्क द्वारे जाऊ शकतो असे निर्देश शासनाने दिले आहेत.याचे अनुपालन करावे असे आवाहन जिल्हापोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांनी उपस्थितांना करित, जिल्ह्यात घडलेल्या काही घटणांचे उदाहरण देत, त्यातील चुका निदर्शनास आणून देत, आपण अलर्ट रहा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा असे सुध्दा त्यांनी यावेळी पुढे बोलतांना सांगितले.

Copyright ©