संपादक सदानंद जाधव
दिग्रस येथे शिवप्रेमी युवकांच्या सतर्कतेमुळे वाचले तीन गाईंचे प्राण
आजारी गायीला गोरक्षण येथे नेण्यासाठी शिवजयंती उत्सव समिती व शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनि सहकार्य केले
आज दि. १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकीकडे उत्साहात साजरी होत असतांना.दुसरीकडे मात्र अवैधरित्या कायद्यापासून वाचण्यासाठी पायीच गाईची वाहतूक करताना दोन युवक शिवप्रेमी युवकांना आढळले. या युवकांनी वेळ न गमावता लगेच विचारपूस केली. मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने संशय बळावला. सदर 3 गायी दिग्रसच्या पोलीस ठाण्यात आणून पुढील कार्यवाही होईपर्यंत कपिला गोरक्षन येथे ह्या गायींना ठेवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, नामे योगेश खामकर रा. देवनगर, दिग्रस यांनी तीन गायी शिवाजी चौक येथून शंकर टॉकीजकडे तीन इसम घेऊन जात असताना त्यांना योगेश खामकर यांनी विचारपूस केली. त्यांनी सदर गाईची खरेदी पावती मागितली असता त्यांच्या जवळ एक पांढ-या रंगाच्या गाईची पावती मिळाली. एक लाल व एक पांढऱ्या रंगाच्या अशा दोन गाईंची खरेदी पावती मिळाली नसल्या मुळे योगेश खामकर यांनी सदर गायी पोलीस स्टेशन,दिग्रस येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी आणून जमा केल्या.त्यापैकी दोन पांढ-या रंगाच्या गाई, एक लाल रंगाची गाय सदरच्या गायी पोलिसांनी ताब्यात घेऊन डॉ अरुण जाधव व डॉ सातपुते यांना बोलावून तिन्ही गाईंचे उपचार करून पुढील कारवाई होईपर्यंत कपिला गोरक्षण येथे ठेवण्यात आले आहे.
दिग्रस शहरासह तालुक्यात गायींची चोरटी वाहतूक होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दिवसाढवळ्या असे प्रकरण वाढत असल्याने दिग्रस तालुक्यातील गोधन संकटात सापडले असून पोलीस प्रश्सासनाने या बाबी कडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी नागरिकांतून मागणी होत आहे



