जोगीनकवडा येथील नागरिकांचे समशान भूमीतील अतिक्रमण हटवण्यासाठी बेमुद्दत आमरण उपोषण
जोगिनकवडा येथील हिंदु समशान भूमीतील संपूर्ण अतिक्रमील शेती असून या समस्येकडे ग्रामपंचयत दुर्लक्ष करीत असून.या बाबीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने २ वर्षापूर्वी ग्रामपंचायत कार्यालया समोर मोहन गिरी यांनी उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना लेखी अश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही न केल्याने स्मशान भुमीत आजही अतिक्रमण संपूर्णत: कायम असून येथे प्रेताचे अंत्यविधीसाठी जागा नसल्याने कोठेही नाल्यात किंवा वन विभागाच्या जागेल अंत्यविधी करावा लागत आहे. अतिक्रमणामुळे जोगिनकवडा येथील नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांना इतरही समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने येथील नागरीक या स्मशानभूमी च्या जागे साठी मोहन गिरी यांच्या नेतृत्वाल ,विजय राठोड, कैलास आत्राम, रघुनाथ लोणकर, अनुराग गिरी विलास आत्राम हे बेमुदत उपोषणास बसलेले असून त्यांना गावातील इतर नागरिक व महिला यांचे मोठया प्रमाणात समर्थन असून स्मशान भूमीतील अतिक्रमण संपूर्ण हटवून स्मशानभूमीला संपूर्ण कुंपण लावून मध्यभागी टिनशेड उभारन्यात यावे . अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे
