Home यवतमाळ माहूर न. च्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे फिरोज दोसानी तर उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे ज्ञानेश्वर...

माहूर न. च्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे फिरोज दोसानी तर उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे ज्ञानेश्वर लाड यांची निवड.

11

 माहूर प्रतिनिधी पद्मा गिऱ्हे

माहूर न. च्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे फिरोज दोसानी तर उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे ज्ञानेश्वर लाड यांची निवड.

मागील दोन आठवड्यापासून माहूर न.पंचा नगराध्यक्ष कोण होणार याबाबत शहरात चर्चेला ऊत आला होता अखेर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची युती होउन राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज दोसानी यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.
दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11वाजता सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किर्तिकिरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली,तर तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांच्या उपस्थितीत नगर पंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी सभा संपन्न झाली सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 राष्ट्रीय कॉंग्रेस 6शिवसेना 3,भाजप 1 असे एकून 17 सदस्य उपस्थित होते, राष्ट्रवादी पक्षातर्फे फिरोज दोसानी तर राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातर्फे राजेंद्र केशवे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज दोसानी यांच्या बाजूने 10 सदस्यांनी मतदान केले तर राजेंद्र केशवे यांना 6 सदस्यांनी मतदान केले भाजपाचे एकमेव सदस्य गोपू उर्फ सागर महामूने यांनी तटस्थ भूमिका घेतली, असून राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज दोसानी यांना पीठासीन यांना 10 सदस्यांनी मतदान केले असल्याने पीठासीन अधिकारी किर्तिकिरण पूजार यांनी फिरोज दोसानी यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषीत केले त्याचदिवशी दुपारी 3.45वाजता उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी शिवसेनेचे ज्ञानेश्वर नारायण लाड यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.शिवसेनेने राष्ट्रवादी च्या उमेदवाराला पाठिंबा देत आघाडीधर्माच पालन कले असल्याची चर्चा माहूर शहरात ऐकावयास मिळत आहे.यावेळी पीठासीन अधिकारी किर्तिकिरण पूजार व तहसील दार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांना कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी, प्रतिक नाईक यांनी याकामी सहकार्य केले . याबाबत नूतन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता महाविकास आघाडीतर्फे ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक त्या पक्षाचा नगराध्यक्ष व दुसऱ्या स्थानी असलेल्या उपनगराध्यक्ष व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना सत्तेत सहभागी करुण घ्यावे असे जाहीर करण्यात आले .

Copyright ©