संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त मेडसी येथे क्रिकेट चे सामने संपन्न
———————————————
यवतमाळ-मेडसी येथिल सर्व बंजारा समाज बांधवाकडून बंजारा समाजाचे दैवत क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त दोन दिवसीय क्रिकेट सामन्याचे आयोजन सेवालाल महाराज स्टेडियम वर करण्यात आले होते. या सामन्याचे उदघाटन प्रा. डी.एस. चव्हाण, प्रेम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या सामन्यात एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला होता. या दोन दिवसीय चुरशीच्या लढतीत प्रथम विजेते व उपविजेते संघास गजुभाऊ राठोड, राजेश चव्हाण, संतोष पवार, विलास राठोड सर यांच्या हस्ते भरीव बक्षीस वितरण करण्यात आले. खेळी मेळीच्या वातावरणात चाललेल्या या दोन दिवसीय सामन्याचे आयोजन अमित राठोड सर, महेश पवार, अमित जाधव, प्रणित आडे, हरीश चव्हाण, निलेश आडे, अखिलेश कोल्हे, दिनेश थुल यांनी पुढाकार घेऊन केले होते. हे सामने यशस्वी करण्यासाठी समस्त बंजारा बांधवांचे अथक परिश्रमासह मार्गदर्शन लाभले. या सामन्यात सहभागी संघाचे व कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आयोजकांनी आभार मानले.
