श्रीकृष्ण जेनेरिकप्लस फार्मा नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित
माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
यवतमाळ : स्वस्त औषधांसाठी प्रसिद्ध असलेले जेनेरिक औषधालय बालाजी सोसायटी परिसरात श्रीकृष्ण जेनेरिकप्लस फार्मा म्हणून नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहे. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता माजी खासदार माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे यांच्या हस्ते या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
- यावेळी प्रमुख पाहुणे बालाजी संस्थान, बालाजी सोसा.अध्यक्ष श्री. विनोदजी देशपांडे यवतमाळ, माजी सभापती, न.प. यवतमाळ सौ. किर्ती संतोष राऊत, माजी उपसभापती, न.प. सौ. रिता गजानन धावतोडे, जेनेरीकप्लस फार्मसी डायरेक्टर श्री. संतोष शेंडगे, श्री. गिरीष जैन, जेनेरीकप्लस फार्मसी रिजनल हेड, श्री. मनोज सोनटक्के, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून माजी ग्रा.पं.सदस्य, उमरसरा गजानन घावतोडे, दिलीप उर्फ बाळू काळे, माजी पं.स.सदस्य विवेक देशमुख, माजी सभापती, न.प. यवतमाळ मनोज मुधोळकर, सामाजिक कार्यकर्ता सोमेश चौधरी, माजी नगरसेवक पंकज देशमुख, माजी नगरसेवक जिवनभाऊ देवकते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री कृष्णा जेनेरिक प्लस फार्मा चे व्यवस्थापक राजेश ढोके, योगेश ढोके, अजिंक्य ढोके, शितल ढोके संजय देवकर यांनी उपस्थित प्रमुख पाहुने तथा मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणातून श्रीकृष्ण जेनेरिक प्लस फार्मा चे व्यवस्थापक राजेश ढोके यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मधुमेह रक्तदाब हृदयविकार हे काही काळापूर्वी पर्यंत केवळ श्रीमंतांचे आजार समजले जात होते मात्र आज कालची जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवन पद्धती मुळे समाजातील सारेच वर्ग या आजाराच्या विळख्यात ओढले गेले आहेत म्हणूनच गरिबांना देखील या आजाराशी सामना करताना औषध सहज आणि माफक दरात उपलब्ध व्हावीत याकरता जेनरिक औषधाचा पर्याय उपलब्ध आहे
