Home यवतमाळ बेलोरा येथिल शेतात शॉट सर्किट मुळे आग लागून लाखो रुपयांचे ऊस जळून...

बेलोरा येथिल शेतात शॉट सर्किट मुळे आग लागून लाखो रुपयांचे ऊस जळून खाक.

12

बेलोरा येथिल शेतात शॉट सर्किट मुळे आग लागून लाखो रुपयांचे ऊस जळून खाक.
———————————————
नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याची मागणी.
———————————————
यवतमाळ- तालुक्यातील बेलोरा शेत शिवारातील शेतकरी आनंदराव सोनबाजी मानकर, अमोल सोनबाजी मानकर व किशोर सोनबाजी मानकर यांचे शेत गट नंबर २२५,२२६,२२७ मध्ये दिनांक १२ फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता अचानक विद्युत शॉट सर्किट होवुन शेतातील ऊसावर आग व ठिणग्या पडल्याने ऊस जळून खाक झाला यात संबधित शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांनी या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी संबधित विभागाकडे लेखी निवेदन देवून केली आहे.
मोठ्या जीवा भावाने जोपासत ऊसाला वाढविले आणि ते आता हाताशी आल्याने मोठे स्वप्न रंगवून कापणीही सुरू झाली होती. मात्र अचानक शॉट सर्किट ने लागलेल्या आगीत ऊस भस्मसात होवुन होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे या शेतकऱ्याचे स्वप्न धुळीस मिळाले असून आता परपंचाचा गाढा कसा हाकायचा, आणलेले कर्ज कसे फेडायचे, जिवन कसे जगायचे नानाविध प्रकारचे सवाल त्यांचे पुढे उपस्थित झाले आहे. त्यामुळे संबधित विभागाने मोका पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करून आम्हास आर्थिक मदत करून आमचे खचलेले मनोबल वाढवावे अश्या आशयाचे निवेदन आनंदराव मानकर, अमोल मानकर व किशोर मानकर या शेतकऱ्यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे निवेदन देवून भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Copyright ©