घाटंजी येथे युवा पुरोगामी विचामंचद्वारा रमाई जयंती उत्सवात साजरी
———————————————
घाटंजी-दिनांक ७ फेब्रुवारी रमाई जयंतीदिन घाटंजी येथील जयभीम चौक परिसरात उत्सवात साजरा करण्यात आला, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारी दिन दलितांची माऊली अनेक कष्ट व हालअपेष्टा सहन करत जिने घराचा सांभाळ करत पतीला साथ दिली त्या माऊली रमाईचा त्याग प्रेरणादायी होता म्हणून ती जगाच्या इतिहासात आदर्श ठरली त्या आई रमाईच्या १२४ वी जयंतीच्या कार्यक्रमाच्या आयोजन युवा पुरोगामी विचारमंचचे अध्यक्ष भाविक भगत यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कवी, साहित्यिक मा.भारतभाऊ लढे होते.
प्रमुख वक्ते म्हणून मोरेश्वर वातीले मधुकर निस्ताने होते,
प्रमुख पाहुणे म्हणून बाबू बोंद्रे,नाझी खान,शोभाताई अलोने,ममताताई वेटी संतोष जीवने प्रफुल राऊत होते.
सर्वप्रथम आई रमाईच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण व दिपबत्ती प प्रज्वलित करण्यात आली.वंदना घेऊन आई रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला ,उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,
प्रमुख वक्ते मोरेश्वर वातीले यांनी
*उंची तुझी रमाई, हिमालयाहूनी मोठी,घे स्विकारूनी आता माझा सलाम कोटी कोटी..!*
रमाई चा त्याग आणि बाबासाहेबाना खरी साथ रमाईंची होती त्यामुळे बाबासाहेब यशाचे उंच शिखर गाठू शकले ,जातीत कोणताही उत्सव साजरा न करता सर्वानी एकत्रितपणे कोणतंही उत्सव साजरा करावं असे मत मधुकर निस्ताने यांनी व्यक्त केले. व माता रमाई यांच्या जीवनपटलावर प्रकाश टाकला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.भारतभाऊ लढे यांनी चळवळीत असलेली स्थिती रमाई यांचा जन्म आणि त्याग त्यांचा बाबासाहेब यांच्या जीवनात रमाईच असलेल महत्व व आजच्या स्त्रीने रमाईचा आदर्श घेणे काळाची गरज आहे युवकांनी व महिलांनी ह्या कार्यक्रमात पुढाकार घेऊन सक्रियपणे कार्य करण्यास पूढे यावं असे आवाहन अध्यक्ष भाषणातून भारत भाऊने केले
रमाई यांच्या जीवनावर आधारित गीत शोभाताई अलोणे यांनी सादर केलं.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रदीप भाऊ रामटेके,संजय टिपले,अजय गजभिये,सचिन काळे,संतोष ओंकार,उमेश घरडे,शेंडे सर कांबळे काका,विष्णू
यांची होती.
कार्यक्रमाचे वंदना सारनाथी गाथा आणि प्रास्ताविक बोधाचार्य संतोष जीवने यांनी केलं
कार्यक्रमाचे सूत्रांचालन भाविक भगत यांनी केलं
तर आभार प्रफुल राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रफुल राऊत भाविक भगत उमेश घरडे यांनी परिश्रम घेतले. या
कार्यक्रमाला असंख्य बौद्ध उपासक व उपसिका उपस्थित होते.
