Home Breaking News शिवसैनिक सुनिल डिवरे हत्या कांडातील फरार दोन आरोपीचे आत्मसमर्पण..

शिवसैनिक सुनिल डिवरे हत्या कांडातील फरार दोन आरोपीचे आत्मसमर्पण..

9

शिवसैनिक सुनिल डिवरे हत्या कांडातील फरार दोन आरोपीचे आत्मसमर्पण..
———————————————
आरोपी संख्या गेली सातवर
———————————————
यवतमाळ- जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भांबराजा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच शिवसैनिक सुनिल डीवरे यांची दिनांक ३ फेब्रुवारीच्या रात्री गोळ्या झाडून व कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली होती. यानंतर सुरुवातीला आरोपींना पवन प्रभाकर सोननकर, वैभव प्रभाकर सोननकर, रोहित भोपळे, सुरेश पात्रीकर या चार आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर रविवार दि.६ फेब्रुवारीला आणखी एक आरोपी सूरज श्रावण मनवर याला अटक करण्यात आली तर फरार असलेले आरोपी अमर किसनलाल जैस्वाल आणि राम किसनलाल जैस्वाल या दोन भावांनी आज मंगळवारला सकाळी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला येवून आत्मसमर्पण केले असून आता सुनिल डिवरे हत्या प्रकरणातील आरोपीची संख्या सात वर पोहचली आहे.
यवतमाळ तालुक्यातील भांबराजा येथिल बाजार समितीचे संचालक तथा शिवसैनिक सुनिल डीवरे यांची सहा दिवसापूर्वी गावातील जुन्या वादातून गोळ्या झाडून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. तर त्यांच्या पत्नीसह मुलाला देखील मारहाण करण्यात आली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली तर नंतर एक व आता दोन आरोपींनी आज आत्मसमर्पण केले असल्याने एकूण आरोपीची संख्या सातवर पोहचली आहे. या घटनेने शिवसैनिक संतप्त झाले होते. त्यांनी या हत्येचा कट कारस्थान कोणी रचला याचे शोध घ्यावे याची मागणी लावून धरली होती अवघ्या सहा दिवसात अपेक्षित आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस करीत आहे. या तपासात आणखी काही वेगळे बाहेर येतील काय यावर जिल्हा वासियांच्या नजरा लागल्या आहे.

Copyright ©