Home यवतमाळ दिग्रस येथे मराठा कुणबी देशमुख समाजातील पुनर्विवाह इच्छुक महिला पुरुषांचा परिचय मेळाव्याचे...

दिग्रस येथे मराठा कुणबी देशमुख समाजातील पुनर्विवाह इच्छुक महिला पुरुषांचा परिचय मेळाव्याचे आयोजन

20

दिग्रस येथे मराठा कुणबी देशमुख समाजातील पुनर्विवाह इच्छुक महिला पुरुषांचा परिचय मेळाव्याचे आयोजन

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा अटळ असून मानवी जीवन हे पाण्याचा बुडबुडा असून केव्हा कोणत्याही प्रसंगाने कोणत्या व्यक्तीवर किंवा कोणत्या महिनलेवर मृत्यू कसा ओडवल्या जाईल याचा काहीही नेम नसल्याचे सर्वश्रुत असून अनेक कुटुंबातील कुटुंब प्रमुख जसे की महिला असो किंवा पुरुष यांचा अनैसर्गिक रित्या मृत्यू ओढवल्याने तसेच कुटुंबातील पती-पत्नीतील समज-गैरसमजाणे विभक्त झालेल्या कुटुंबाची वाताहात पाहायला मिळते. हीच बाब लक्षात घेऊन मराठा कुणबी देशमुख समाजाने विधवा विधुर घटस्फोटित महिला व पुरुषांचा परिचय मेळावा आयोजित करून पुरोगामी महाराष्ट्राला साजेसे असे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारसरणीवर आधारित एक महत्त्वाचे पाऊल पुनर्विवाहेच्छुकांच्या परिचय मेळाव्याचे आयोजन करून उचलले आहे. अशा प्रकारचा दिग्रस तालुक्यातील पहिलावहिला राज्यस्तरीय परिचय मेळावा दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन दिग्रस येथे आयोजित करण्यात आलेला आहे. समाजामध्ये विधवा विधुर घटस्फोटीत यांना कायम दुय्यम स्थान दिले जाते त्यांच्या नवजीवनाच्या दिशेने पुन्हा पाऊले उचलण्याचा प्रयत्न यानिमित्ताने कुणबी मराठा देशमुख समाजाने केलेला आहे. नियतीने विस्कटलेली संसाराची घडी पुन्हा नीट बसावी या उदात्त हेतूने पुनर्विवाह इच्छुकांच्या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठा सेवा संघ आणि सर्व समविचारी संघटना या कायम राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित समाजाचे संघटन करण्याचे कार्य करीत आहे. त्यादृष्टीने पोटजाती अंतर्गत विवाह जुळविणे तसेच विधवा विधुर घटस्फोटित यांच्या नवजीवनाची सुरुवात त्यांचे पुनर्विवाह जुळवून करणे असे पुरोगामित्वाच्या दिशेने एक कृतिशील पाऊल मराठा कुणबी समाजाने टाकलेले आहे. या परिचय मेळाव्याला जास्तीत जास्त पुनर्विवाह इच्छुक महिला व पुरुषांनी कोणताही संकोच न बाळगता प्रतिसाद द्यावा व मेळाव्यामध्ये आपला परिचय द्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. परिचय दात्यांना नोंदणी करतेवेळी आपले आधार कार्ड झेरॉक्स, पासपोर्ट फोटो, तसेच परिचयपत्र देऊन नोंदणी करावयाची आहे. नोंदणी शुल्क रुपये दोनशे इतकी रक्कम अदा करून आपली नोंदणी खालील प्रतिष्ठान वर करणे सुरू आहे. ओंकार ठाकरे शिव किराणा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिग्रस मो.8625957981 नानाभाऊ शिखरे मॉ जिजाऊ झेरॉक्स, तहसील चौक, दिग्रस मो. 880520025 लक्ष्मण टेकाळे स्टेट बँँक समोर दिग्रस मो. 9890253749 . सौरभ मोरे सौरभ मोबाइल गॅलरी,मो.7744066806 जुना पेट्रोल पंप जवळ, दिग्रस. सुदर्शन हसबेप 7517990986 रमाकांत काळे 9422641144 प्रज्योत अरगडे 8806643141
यांच्याशी संपर्क साधावा

Copyright ©