प्रा जयवंत जुकरे यांना पि एच डी पदवी जाहीर
————————————
किन्ही(वळगी) जिजामाता कला महाविद्यालय दारव्हा, जिल्हा यवतमाळ येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि समाज बांधव श्री. प्रा. जयवंत पीराजी जुकरे सर यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांची मानव्यविद्या शाखेंतर्गत राज्यशास्त्र या विषयातील सर्वोच्च विद्यावाचस्पती (Ph. D.)ही पदवी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आणि जोखमीच्या स्थितीत कौटुंबिक पार्श्वभूमी असून देखील उच्च शिक्षणासाठी त्यांनी स्वतःची नाळ जोडून घेत भविष्याचे मार्ग यशोदायीरित्या पादाक्रांत करण्याचे कार्य पूर्ण केलेले आहे. माहितीचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीमुळे लोकशाही व्यवस्थेतील महसूल प्रशासनात निर्माण झालेली पारदर्शकता: एक चिकित्सक अध्ययन विशेष संदर्भ यवतमाळ व वाशिम जिल्हा (कालखंड २०१०-२०१८) विषयांतर्गत प्रोफेसर एस पी चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करून शोधप्रबंध सादर करण्यात आलेला होता. प्रस्तुत संशोधन कार्याचे बहिस्थ परीक्षक का मार्फत परीक्षण करून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी दिनांक सहा जानेवारी 2022 रोजी त्यांची मौखिक परीक्षा निर्धारित वेळेत घेतली. मौखिक परीक्षा यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी घोषित केलेली आहे.
डॉ. जे. पी. जुकरे सर यांनी संपादित केलेल्या यशाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील लोकप्रशासन विषयाचे गाढे अभ्यासक डॉ. एम. सी. पवार सर, जिजामाता कला महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. मानिकरावजी ठाकरे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य समाज भूषण प्रोफेसर आश्रू जाधव सर, लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. शंकररावजी अवचार साहेब, लसा कामाचे माजी प्रदेशाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. माधवरावजी गादेकर सर, प्रोफेसर डॉ. भगवानरावजी वाघमारे सर, प्रोफेसर डॉ. राजकुमारजी मस्के, सन्माननीय दावलवार साहेब, लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे विद्यमान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उपप्राचार्य संजयजी गायकवाड सर, प्राचार्य बी. एन. गायकवाड सर, लसाकम, ऑनलाईन सभासद नोंदणी प्रमुख डॉ. दयाराम मस्के, राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक शिवा कांबळे सर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध शहरातील समाज बांधवांनी डॉ. जयवंत पिराजी जुकरे सर यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील कार्यास सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
