Home यवतमाळ मंगरूळध्ये मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

मंगरूळध्ये मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

8

मंगरूळध्ये मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

गुरुदेव सेवा मंडळ मंगरुळ व समस्त गावकऱ्यांच्या वतीने दिनांक बारा जानेवारीला मॉंसाहेब जिजाऊ व आधुनिक भारताचे शिल्पकार स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती विठ्ठल रखुमाईच्या प्रांगणामध्ये साजरी करण्यात आली.
राष्ट्रमाता, राजमाता मॉं जिजाऊ, युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पमाला अर्पण विष्णुपंत राऊत, मीराताई ठाकरे व गणेश जोगे यांचे हस्ते करण्यात आले.
मॉं जिजाऊनी एक पुत्र व एक नातू सुसंस्कारित करून स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न साक्षात खरे करून दाखवले. एक आदर्श माता व एक धैर्यशील , कर्तबगारी स्त्रीचे दर्शन जिजाऊ चरित्रातून घडते.तरूणांनो उठा ! जागे व्हा ! ध्येय प्राप्त होईपर्यत थांबू नका. अभी: अभी: म्हणजे निडर बना. भावी भारताचे यश तुम्हा तरूणांच्या हातात आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमधले जे चांगले ते अवश्य घ्यावे व आपलेही संस्कृती मूल्ये त्यांना द्यावीत. असे सुतोवाच संत साहित्याचे अभ्यासक व यवतमाळ तालुका गुरूदेव सेवा मंडळाचे संघटक , प्रा.डॉ. अनंतकुमार सूर्यकार यांनी प्रसंगी केले.
विष्णुपंत राऊत, मीराताई ठाकरे, विठ्ठल कोडापे, ताराचंद चव्हाण, रामेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, बाळू महल्ले, महादेव तुमडाम, ज्ञानेश्वर गावंडे, मिलिंद ठाकरे, विजय ढोके, मोहन ठाकरे, राजू नागदेवते, गणेश खेरे, गणेश सोनोने, गणेश जोगे, गणेश बनकर, रूपेश चव्हाण, संजय जाचक, प्रकाश राऊत, दिगंबर इंगोले, नारायण सूर्यकार, मारोती पवूळ, पार्थ ठाकरे या मान्यवरांसह गावातील बहुसंख्य स्त्री-पुरूष प्रसंगी उपस्थित होते.तसेच गावातील तरूण वर्गाची हजेरी मोठ्या प्रमाणात होती तसेच छोट्या मंडळींच्या निनादाने कार्यक्रमाची शोभा वाढली.
दोन बालिकांनी मॉं जिजाऊची आकर्षक अशी वेशभूषा केली होती.
शेवटी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोडापे यांनी सर्वांचे आभार मानले.

Copyright ©