वंचीत बहुजन आघाडी घाटंजीच्या वतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब वंदन
———————————————
घाटंजी- वंचित बहुजन आघाडी घाटंजी च्या वतीने राजमाता जिजाऊ माँ साहेबांची 424 वि जयंती साजरी करण्यात आली माँ साहेबांनच्या संस्काराने साकार झालेले. महाराष्ट्राचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जाती ला सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. जात पंत धर्म यांच्या पलीकडे जाऊन महाराजांनी समता प्रस्थापित केली. महाराजांच्या काळात महिला सुरक्षित होत्या. महिलांचा सन्मान करून महिलांना समानतेची वागणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात मिळत होती. हे समतेचे बाळकडू महाराजांना माँ जिजाऊ माँ साहेबांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून जिजाऊ माँ साहेबाच्या प्रतिमेला उमा भोजवार यांनी पुष्पमाला अर्पण करून वंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता धोत्रे यांनी केले तर या प्रसंगी रा.वि.नगराळे व अनिल रामटेके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे संचालन पदमाताई खोब्रागडे यांनी केले व वंचित महिला आघाडी श. अध्यक्ष बबिता राऊत यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी चे ता. अध्यक्ष संघपाल कांबळे, अन्नपूर्णा गजभिये, करुणा नरांजे, वनिता रामटेके, पल्लवी गजभिये, शिवानी वाघमारे, दुर्गा गजभिये, मनीषा मेश्राम, मयुरी चौरीवार, पौर्णिमा चावरे, ममता गेडाम, पूनम मानकर, शालू पाटील, अर्चना घुसे, कांचन शेंडे, ज्योत्स्ना मनोहर, सुरज रामटेके, संजय कांबळे, यशवंत भगत, निखिल टिपले, नयन गाडे, गौरव शेंडे, चांदेकर, प्रतीक पाटील उपस्थित होते.
