कोविड-१९ चे निर्बंध बाळगून ग्रामीण भागातील शाळा सुरू ठेवण्याची मागणी
——————————————–
भांब(राजा) येथिल सरपंच व उपसरपंच यांची
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
————————————-——-
यवतमाळ- मागील अडीच वर्षांपासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शहरासह ग्रामीण भागातील शाळा बंद असल्याने यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवून त्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याने कोविड-१९ चे सर्व निर्बंधाचे नियम लावून ग्रामीण भागातील शाळा सुरू ठेवाव्यात अश्या मागणीचे निवेदन भांब(राजा) येथिल सरपंचा अनुप्रिया सुनिल डीवरे व उपसरपंच दत्ता राठोड यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे.
मागील अडीच वर्षांपासून कोरोना महामारिमुळे ईतर निर्बंधा सोबतच शाळाही बंद करण्यात आले. यात विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान उदभवले काही शाळेने ऑनलाईन शैक्षणिक प्रणालीचा वापर सुरू केला. मात्र ग्रामीण भागातील पालक हा गरिबीने होरपळून गेला असून त्यांचे कडे तश्या प्रकारचा मोबाईल उपलब्ध नाही. ज्यांचे कडे आहे. त्यांना त्यात ब्यालेन्स टाकण्याची सोय नाही. त्यामुळे या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होत असेल असे वाटत नाही. त्यामुळे ग्रामीण ऑफलाईन शैक्षणिक पद्धतीच तारू शकते त्यामुळे या विद्यार्थ्यांचा भवितव्याचा विचार करून साधारण तीन तास तरी शाळा सुरू ठेवावीत. सोबतच कोरोनावर मात करण्यासाठी सर्व निर्बंध लावून वर्ग १ ते ८ पर्यंत पन्नास टक्के उपस्थिती ठेवावी. एखाद्या शाळेत किंवा त्या गावात रुग्ण आढळल्यास त्याठीकांनचीच शाळा बंद करावी. शाळा बंद असल्याने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे भयानव अवस्था निर्माण झाली असून. शाळा सुरू ठेवल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मन विचलित होणार नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्यात याव्या ही मागणी घेवून भांब(राजा) येथिल सरपंच अनुप्रिया सुनिल डीवरे व उपसरपंच दत्ता राठोड यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देवून मागणी केली आहे.
