श्रीक्षेत्र माहूर/ ता.प्र.पद्मा गिऱ्हे
माहूर भाजपाने काळ्या फिती लावून केला पंजाब सरकारचा निषेध.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी पंजाब प्रांतातील फिरोजपूर येथे दौर्यावर गेले होते विशेष म्हणजे या दौऱ्याबाबत केंद्र सरकार व गुप्तचर खात्याने सुरक्षेबाबत पंजाब सरकारला माहिती दिली होती असे असतानांं पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेस सरकारने हेतुपुरस्सर राजशिष्टाचाराचे पालन न करता केवळ द्वेशापोटी त्यांना सुरक्षा पुरविण्यात कमालीचा हलगर्जीपणा करत त्यांचा ताफा रस्त्यात अडवून एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा जणू कटच रचला होता.पंजाब सरकारच्या या निंदनीय क्रुतीचा दिनांक 12 जानेवारी रोजी माहूर भाजपाने काळ्या फिती लावून पंजाब सरकारचा निषेध करुन या कटकारस्थानात सहभागी असलेल्या पंजाबचे मुख्यमंत्री, अधिकारी यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तहसिलदार माहूर यांना दिले या निवेदनात अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगी शामबापू भारती महाराज, भाजपा नेते तथा विधानसभा संयोजक अॅड रमण जायभाये, तालूका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, शहराध्यक्ष गोपू महामूने, महिला शहराध्यक्षा अर्चनाताई दराडे यांचेसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
