Home यवतमाळ शेतकरी बांधवांनो शेतातील काडीकचरा, तुराट्या, पराठ्या जाळू नका त्याचे उत्कृष्ट कंपोस्ट (सेंद्रिय)...

शेतकरी बांधवांनो शेतातील काडीकचरा, तुराट्या, पराठ्या जाळू नका त्याचे उत्कृष्ट कंपोस्ट (सेंद्रिय) खत तयार करा.- पांडूरंग निकोडे

8

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

शेतकरी बांधवांनो शेतातील काडीकचरा, तुराट्या, पराठ्या जाळू नका त्याचे उत्कृष्ट कंपोस्ट (सेंद्रिय) खत तयार करा.- पांडूरंग निकोडे
——————————————–
सेंद्रिय खत व रासायनिक खत याचा एकात्मिक वापर हाच आजच्या शेती व्यवसायावर उपाय

घाटंजी-गेल्या अनेक वर्षापासून विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करीत आहे, राज्यकर्त्यांच्या शेतकरी विषयक धोरणामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र व राज्य सरकारचे कृषी खाते नावापुरते असून केवळ कागदी घोडे नाचवून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात डोळेझाक करीत आहे, याच अनुषंगाने आधार संस्थेच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, आपल्या शेतातील काडीकचरा, तुराट्या, पराठ्या जाळू नका, त्याचे उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार करण्यासाठी सोप्या पद्धतीचा वापर करून शेतामध्ये ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही अश्या उंच ठिकाणी10बाय 6 बाय 3 चौरस फूट किंवा आपल्या सोयीनुसार खड्डा करून त्यामध्ये प्रथम एक फूट काडीकचरा त्यावर कंपोस्ट कल्चर( जिवाणूखत) कालवून टाकावे किंवा सुपर फॉस्फेट खत त्यावर टाकावे अशा पद्धतीने संपूर्ण थर दाबून घ्यावा खड्डा भरून झाल्यावर त्यावर माती झाकून खड्डा शक्य असल्यास शेणा मातीने लिहून घ्यावा. दीड ते दोन महिन्यात उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होते, अधिक माहितीकरता आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा कारण रासायनिक खतांच्या अती वापराने शेती नापीक बनत आहे. असे खत प्रत्येक शेतकऱ्याने केल्यास लाखो मेट्रीक टन सेंद्रिय खत आपल्या परिसरात तयार होऊ शकते,व शेती मध्ये सेंद्रिय खत टाकल्यास जमीन सुपीक बनवून शेतीचे उत्पादन वाढते. कारण सेंद्रिय खत व रासायनिक खत याचा एकात्मिक वापर हाच आजच्या शेती व्यवसायावर उपाय आहे. असे आवाहन आधार संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग निकोडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Copyright ©