Home यवतमाळ पशू खाद्याचे दर गगनाला पशुपालक सापडला अडचणीत  प्रकाश लगोंटे

पशू खाद्याचे दर गगनाला पशुपालक सापडला अडचणीत  प्रकाश लगोंटे

9

पशू खाद्याचे दर गगनाला पशुपालक सापडला अडचणीत 
प्रकाश लगोंटे
——————————————–
दूध उत्पादक आला मेटाकुटीस
——————————————–
यवतमाळ- ढेप-सरकीच्या दरात एक हजार ते पंधराशे रुपये पर्यंत प्रती क्विंटल वाढ झाल्याने पशू पालकाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एवढेच नव्हे तर दूध उत्पादकही आर्थिक अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सरकी- ढेपचे भाव वाढती वरच आहे. सध्यस्थितीत सरकी- ढेपचे भाव प्रती क्विंटल तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये पर्यंतच्या घरात पोहचले आहे.
सध्या सरकी- ढेपेला जास्त मागणी असल्याने यवतमाळ बाजारात ढेप ३५०० ते ३६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहे. अचानक दर वाढ झाल्याने आधीच दूध उत्पादक शेतकरी वर्गाचे घटलेल्या दूध उत्पादनामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेकांनी कर्जावू रकमेतून शेतीपूरक रोजगार म्हणून जनावरे घेतली यात त्यांची चांगलीच गोची झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात सरकीचा दर किलोमागे आठ ते दहा रुपये तर क्विंटल मागे सरसकट एक हजार रुपये वाढ झाली आहे. दुधाळ गायीला व म्हशीला हे खाद्य दुधाळ जनावरांना संजीवनी असते. तेच महागाईच्या विळख्यात सापडल्याने पशुपालक शेतकरी बेचैन झाला आहे. दुधाळ जनावरांना सकस आहार नियमित असल्यास दूध उत्पादनात वाढ होवून आर्थिक फायदा होतो. जनावरांना प्रथिने युक्त आहार मिळत असल्यास त्यांच्या आरोग्यासाठी पूरक ठरून जनावरे सदृढ राहतात. मात्र आता पशुखाद्यचे भाव वाढल्याने दूध उत्पादक चांगलाच अडचणीत सापडला आहे. सध्याचा चालू दर तीन हजार ६०० वर पोहचला आहे. हिरवा चारा सततच्या पावसामुळे खराब झाला असून अनेक रोगांचे मूळ ठरू पाहत आहे. साठवलेला कडबा कुटार तनससारख्या वैरणाचेही भाव वाढल्याने व मिळत नसल्याने पशुपालक शेतकरी बेजार झाला आहे. त्यामध्ये दुधाचे दर व खाद्याचे दर याचा विचार केल्यास दूध उत्पादक चांगलाच अडचणीत सापडला असल्याने शासन स्तरावरून या बाबीचा विचार होणे गरजेचे आहे असे प्रकाश लगोटे यांनी मागणी केली आहे

Copyright ©